स्वच्छता ही सेवा या पंधरवड्यामध्ये अलिबाग नगरपालिका कडून स्वच्छता मोहीम , वृक्षारोपण आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, त्याचबरोबर संपूर्ण अलिबाग शहर सफाई करणारे कर्मचारी यांचे व नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधोचार देण्यात आले.या शिबिराचा 60 लाभार्थी नी लाभ घेतला.
माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी सफाई कर्मचारी हेच स्वच्छतेचे देवदूत असल्याचे सांगत प्रत्येकाने स्वतःचे आरोग्य सांभाळले पाहिजे व परिसरात कोणी कचरा प्लास्टिक टाकू नये असे आवाहन केले.
अलिबाग नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. अंगाई साळुंखे यांनी सर्वांनी व्यसनापासून दूर राहुन स्वतःचे आरोग्य व कुटुंबाचे आरोग्य सांभाळावे असे सांगत स्वच्छतेचे महत्व सांगितले.
यावेळी माणुसकी प्रतिष्ठानकडून डॉ. शहीदा अन्सारी ,अमय ढोरे अलिबाग नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



