रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या आवाहनानुसार व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आरोग्यदायी व पर्यावरण पूरक निर्मल गणेशोत्सव माणुसकी प्रतिष्ठान यावर्षी सुद्धा साजरा करत दीड दिवसाच्या बाप्पाचे घरगुती कृत्रिम तलावात विसर्जन केले.
माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान व सदस्य डॉ सिद्धार्थ कुलकर्णी यांच्या सरस हॉस्पिटल जीतनगर वायशेत येथील मातीच्या बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलाव तयार करून त्यामध्ये विसर्जन केले.
डॉ हुलवान यांनी निर्मल , आरोग्यदायी, पर्यावरण पूरक गणेशोत्सव सर्वांनी उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले.
या वेळी माणुसकी प्रतिष्ठान सल्लागार अमृत म्हात्रे, कार्यकारी उपसचिव सुधाकर निसाद व इतर सदस्य उपस्थित होते.



