Kridavedhnews

निर्मल गणेशोत्सव साजरा करू प्रदूषणाला आळा घालू –

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखीलआपण निर्मल गणेशोत्सव साजरा करत आहोत तरी प्रत्येकाने आपापल्या घरी, आपापल्या परिसरात ,आपल्या परिसरातील तलावात किंवा समुद्रकिनारी, आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जे निर्माल्य इकडे तिकडे पडलेले असते ते एका ठिकाणी गोळा करून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्या घरातील देखील निर्माल्य एका ठिकाणी गोळा करून ते योग्य त्या ठिकाणी ठेवायचं आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी ते कंपोस्ट खत बनवण्याच्या प्रक्रियेत वापरायचा आहे तसेच आपण निर्मल गणेशोत्सवाचे जनजागृती करायची आहे. आपल्या सोबत आपल्या आसपासचे आपल्या गावातल्या सर्व लोकांनी जर या वेळेला निर्मल गणेशोत्सव, पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करायचा ठरवला तर प्रदूषणाला खूप मोठा आळा बसेल व आपला निसर्ग स्वच्छ आणि चांगला राहील. आपण निरोगी राहू सर्व जण निरोगी राहतील आणि उत्साहात आपण सण साजरे करू खूप खूप धन्यवाद.
डॉ राजाराम हुलवान
माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio