Kridavedhnews

स्वच्छ्ता हीच आरोग्याची गुरुकिल्ली – डॉ राजाराम हुलवान

गारबेज फ्री इंडिया व ग्रामपंचायत नारंगी यांच्या संयुक्त विद्यमाने आज नारंगी गावात आरोग्य व स्वच्छता या विषयावर डॉ.राजाराम हुलवान यांनी गावातील महिला, विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
स्वच्छ्ता हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे , प्रत्येक गाव जर प्लॅस्टिक मुक्त झाला तर संपूर्ण देश स्वच्छ होईल व रोगराई कुठेही पसरणार नाही असे सांगत डॉ हुलवान यांनी वृक्षारोपण व संगोपनाचे महत्त्व पटवून देत वैयक्तिक स्वच्छता , मुलांच्या आहाराबाबत व दिनचर्या बाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सरपंच उदय म्हात्रे,शिक्षिका सुजाता मोकल व महिला बचत गटांच्या अध्यक्षा सदस्य , ग्रामस्थ , ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी गारबेज फ्री इंडिया व हिरेमठ परिवार कडून विद्यार्थांना चांगल्या प्रतीचे शूज वाटप करण्यात आले. सूत्र संचालन समाज सेवक कृष्णा वाघमारे यांनी उत्तम रित्या करीत सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio