रोटरी जंगल कॉन्सेप्ट,थळ येथे मयेकर डोंगरीवर आज ९०० रोपांची लागवड केली.या कामात दरवर्षी प्रमाणे माणुसकी प्रतिष्ठान,जितनगर यांनी मोलाचे योगदान दिले तसेच सुरभी स्वयंसेवी संस्था, अलिबाग आणि को ए सो. थळ चे ९वी १०वी चे विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.रोटरॅक्टस सकाळी ८ वाजल्या पासून झाडे लावन्यास सुरुवात केली . हातभार लावणाऱ्या सर्व सभासदांचे, अवधूत सप्रे अध्यक्ष निसर्ग सुंदर थळ सामाजिक संस्था,
डॉ. राजाराम हुलवान तसेच माणूसकी प्रतिष्ठान सदस्य व रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोर चे अध्यक्ष डॉ. निलेश म्हात्रे यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे आजचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. आज ९०० निरोगी झाडे लावन्यात आली.आता सर्व निसर्ग प्रेमीची जबाबदारी अजून वाढली आहे. ह्या सर्व झाडांना उन्हाळ्यात पाणी घालून मोठी करण्याची शपथ आजच १५ ऑगस्ट रोजी सर्वांनी घेतली.
कार्यक्रमास डॉ. कुमठेकर, डॉ. अनुपमा कुमठेकर,डॉ.जी टी पाटील,डॉ. डोंगरे, डॉ. तिवारी,डॉ. चांदोरकर यांनी सर्वांनी वृक्षारोपण करण्याचा मनसोक्त आनंद घेतला.तसेच अनेक कार्यकर्ते ह्या कामात मग्न झाले होते. विशेष रोटरी क्लब चे खजिनदार जनार्दन चापडे,सचिव.दिलीप भड, निमिष परब,अंकुश पाटील, जगदीश राणे, कुमार जोगळेकर यांनी सर्वांनी मेहनत घेतली



