Kridavedhnews

गरज जिथे जिथे आर्य वैश्य युथ तिथे तिथे

मित्रांनो,
नुकताच पुणे शहरात वासवीरत्न पुरस्कार सोहळा -2023 शानदारपणे न्यु इंग्लिश स्कुलच प्रागंणात पार पडला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आर्य वैश्य युथ पुणे(महाराष्ट्र) यांनी केले होते.
समाजातील कला, शिक्षण, वैदयकीय, शैक्षणिक,व व्यावसायिक या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या वासवीमातेचं कन्येला वासवीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच समाजातील गुणीजनांचा Pride of Arya Vaishya -2023 ने गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी आर्य वैश्य युथचे पुणे जिल्हाप्रमुख मा.संजयदादा कोंडावार तसेच युथचं पुणे महिला जिल्हाध्यक्षा सौ. वैशाली सातभाई हे होते.
🌸 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 🌸
मा.भालचंद्र देबडवार सर
मा.अनिल शक्करवार सर
मा.संजयजी मुनगीलवार सर
हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलननाने झाली.युथचं सांस्कृतिक समिती उपाध्यक्ष सौ.अंकिता रुद्रवार व सहकारी सौ.पुजा रेखावार, कु.अश्विनी रेखावार कु.समिक्षा व कु.श्रुती जवादवार ,कु.रक्षीता गंजेवार यानी अप्रतिम गणेशवंदना सादर करत समाजबांधवांची मने जिकंली.
यांनंतर युथचे संस्थापक अध्यक्ष मा.सुर्यकांतभाऊ कोकड व सौ.स्नेहलताई लाभसेटवार तसेच पाहुण्यांच हस्ते आर्य वैश्य कुलस्वामिनी वासवीमाता व छत्रपती शिवरायांचं प्रतिमा तसेच वेंदातकेसरी श्री रंगनाथमहाराजाचं प्रतिमेचे पुष्पहार घालुन पुजन झाले.

यावर्षी आर्य वैश्य युथ पुणे यांनी पुणे शहरात राहणाऱ्या तमाम युवक आणि युवतींना साद घालत Connect them young हा कार्यक्रम सकाळी 9:00 ते 11:00 या वेळेत ठेवण्यात आला. प्रा. सुराणा सर यांनी युवकांना मार्गदर्शन केले.पुणे शहरात राहत असताना तरुणांना भेडसवणारी विविध प्रश्न यावर चर्चा करण्यात आली.
यंदा पहील्यादांच समाजबांधवासाठी Start Expo ,चे आयोजन करण्यात आले त्याला समाजबा़धवांनी भरभरुन दाद देत विविधप्रकारचं 18 स्टॉलचे प्रदर्शन ठेवण्यात आले.
संस्कृतीचे माहेरघर असणार्या पुणे शहरात कोमटी समाजाचे युथ गर्जना हे ढोल ताशापथक स्थापना करण्यात आले.पथकाचे अध्यक्ष , डॉ.अथर्व डुब्बेवार यांनी स्टेजवरच ढोल वाजवत कोमटी समाजाचे पुणे शहरातील पहीले ढोलताशा पथक दाखल झाले आहे.याचीच गर्जना करत तमाम समाजबांधवांची मने जिकंली.🥁🥁
दुपारचं जेवणानंतर आर्य वैश्य युथचं पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाला सुरुवात झाली.प्रमुख मार्गदर्शक युथचे संस्थापक अध्यक्ष मा्.सुर्यकांतभाऊ व युथचं महिला महाराष्ट्र कार्यकारणीच अध्यक्षा .डॉ. स्नेहलताई लाभसेटवार यांनी बहुमोल मार्गदर्शन करीत युथचं विविध जिल्हयात सुरु असणारी कार्य व कार्याचा वेग वाढवण्यासाठी कशापध्दतीने रणनीती आखावी यावर बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी परभणी ,नांदेड,गंगाखेड,लातुर अशा विविध ठिकाणाहुन युथचं शिलेदार या अधिवेशनाला दाखल झाले होते.आर्य वैश्य युथचे पुणे शहराचे शहराध्यक्ष श्रीहरी गादेवार यांनी सर्वाचे स्वागत केले व युथचे पुणे संघटनप्रमुख मा.विनायकभाऊ मुनगीलवार यांनी सर्वाचे आभार मानले.
उल्लेखनीय कामगिरी करणार्या युथ पदाधिकारी यांना युथ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.सुप्रिया गादेवार व चि.रुचा पोकलवार यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडले.
सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी विविध कमेटी स्थापन करुन जबाबदारी चे नियोजन करण्यात आले.यात विठ्ठलकाका मुरकेवार,सुनिल जवादवार ,प्रविण उत्तरवार,गजानन अर्थमवार,अक्षय नारलावार,विनोद मद्रेवार,अमित कोंडेवार,कुणाल रुद्रवार,विकास कोलपेकवार,विनय पद्ममवार,ज्ञानेश्वर कोटगीरे,अंकुश लाटकर,गजाननजी चौधरी,रामेश्वर मद्रेवार,दिलीपकाका मोदी, प्रल्हादमामा जवादवार, प्रा. डॉ.उमाकांत कोंडेवार सर,शुभम मालशेटवार,महेश रायचुरकर,गजानन गुंडावार,सतिश जवादवार,अमोल चंदेरगी,संगमेश पोलावार,अमोल मद्रेवार,इ तसेच महिला कार्यकारणी सदस्या सौ.सारिकाताई अर्थमवार,सौ.मोहीनी मुनगीलवार,सौ.स्मिता चौलवार,सौ.स्नैहा सायनवार,सौ.कल्पना भावटणकर, सौ.अमृता झरकर,सौ.प्रिया कोटगीरे सौ. दर्शना मुर्के इ.सर्व नियोजन कमेटी मेंबरचे खुप खुप आभार !
🌹विशेष आभार 🌹
कार्यक्रमाचे आधारस्तंभ
1)चंदावार बिल्डर्स अँड डेव्हलपस पुणे
2)(VTOP) बिल्डर्स पुणे
3)श्री.मदन व सौ.वैशाली सातभाई
4) प्रितम गुप पुणे.
5)संजयदादा कोंडावार
सदर कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी आर्थिक पाठबळ देणार्र्या सर्व देणगीदारांचे ,हितचिंतकांचे आभार !
आभाळातुन गडगडणारा पाऊस व कोलमडलेली वाहतुकव्यवस्था यांना न जुमानता जे युथचे पदाधिकारी व समाजबांधव कार्यक्रमाला उपस्थित होते ज्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वी झाला .व ज्यांना उपस्थित राहता आले नाही पण फोनवरुन शुभेच्छा दिल्या त्या युथचं शिलेदारांना पुणे आर्य वैश्य युथ टीमचा मानाचा मुजरा !🚩

🌸 जय वासवीमाता🌸
🚩 जय रंगनाथमहाराज 🚩

आपला
दिपक भावटणकर
आर्य वैश्य युथ
पुणे
जिल्हाध्यक्ष🚩

गरज जिथे जिथे
आर्य वैश्य युथ तिथे तिथे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio