21 जून या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 25 जून रोजी नव्या योग दिनानिमित्त सकाळी सात ते नऊ या वेळेत कल्पतरू सोसायटी पिंपळे गुरव येथे लावण्य योगा ग्रुप तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात योगा गुरु लावण्या काकुमानु यांनी थोडक्यात योगाचे महत्त्व सांगून केली. समारंभाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे योग प्रशिक्षक श्री जयंत पंडित व फिटनेस प्रशिक्षक श्री सतीश बांदल यांनी दीप प्रज्वलानाने केली.
महिलांनी शिव स्त्रोताचे गायन केले.
कार्यक्रमात लहान मोठ्या मुलांपासून महिलांनी योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवली लहान मुलांनी जोडीने करावयाची विविध ॲडवान्स आसने तसेच सूर्यनमस्काराचे विविध प्रकार अतिशय लयबद्धतेने केले महिलांनी सूर्यनमस्कार व विविध आसने केली.
ज्येष्ठ महिलांनी देखील अतिशय छान टाळी योग प्रात्यक्षिक केली मुले व महिलांबरोबर सर्व प्रेक्षकांनी प्रोटोकॉल आसने व योगिक जॉगिंग मध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या सर्व योग प्रात्यक्षिकाला सुंदर अशा श्रीकृष्ण व श्री शंकराच्या पार्श्व संगीताची साथ होती. सर्व सहभागींना सूर्य पतंजली योग संस्थान तर्फे प्रमाणपत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आले. अशा भरगच्च योगा कार्यक्रमाची सांगता योग गीत, शेतकरी – सैनिक – शिवाजी महाराज यांची घोषवाक्ये संकल्प व शांती मंत्राने झाल्यावर आभार प्रदर्शनाने झाली.



