भारतीय जैन संघटना संस्थापक अध्यक्ष श्री. शांतीलालजी मुथ्था यांच्या प्रेरणेने तसेच भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. नंदकुमारजी साखला, भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य सचिव श्री. दिपकजी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जैन संघटना , पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड येथे दि. २१/०६/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.पिंपरी चिंचवड पुणे विभागाच्या वतीने भामाशाह श्री. रसिकलाल माणिकचंद धारीवाल स्थानक भवन,भीमाशंकर काॅलनी, रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ, पिंपळे गुरव, पुणे -४११०६१ येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी योग प्रशिक्षक तसेच फिटनेस प्रशिक्षक श्री. सतिश भाऊसाहेब बांदल (संचालक स्ट्रेचिंग स्टुडिओ,संस्थापक क्रीडा वेध महाराष्ट्राचा), भारतीय जैन संघटनेचे पुणे विभागीय कार्यकारिणी सदस्य श्री. महावीरजी कर्नावट, भारतीय जैन संघटना पिंपळे गुरव अध्यक्ष श्री. अभिनंदन छाजेड, उपाध्यक्ष श्री. गणेश मुथ्था, उपाध्यक्ष श्री. संदीप डोशी, सचिव श्री. मंगेश मुथ्था, यशराज कर्नावट,विनोद ओस्तवाल,लौकिक कर्नावट,शुभम संचेती,सुनील कोठारी,ललित संचेती, महिला अध्यक्ष सौ. प्रियाली कर्नावट, उपाध्यक्ष सौ. सारिका डोशी, उपाध्यक्ष सौ. डॉ. शितल ओस्तवाल, सचिव सौ. डॉ. कविता भंडारी,किशोरी कर्नावट,शितल कर्नावट,रूपाली लुंकड
नीता बाफना आदि मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योगा दिन कार्यक्रमासाठी स्पॉन्सरशिप महावीर ग्रूप ऑफ कंपनिज तसेच प्रोमो इन्फ्रा अँड इंटेरियर या पुणे पिंपरी चिंचवड येथील नामांकित इंटेरियर डिझायनिंग कंपनीचे डायरेक्टर श्री महावीर कर्नावट यांच्या तर्फे करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त योग प्रशिक्षक तसेच फिटनेस प्रशिक्षक श्री. सतिश भाऊसाहेब बांदल (संचालक स्ट्रेचिंग स्टुडिओ , संस्थापक क्रीडा वेध महाराष्ट्राचा) यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. त्यांनी योगा व्यायामाचे सातत्य ठेवल्यास आपण अनेक रोगांवर आणि व्याधींवर कशा प्रकारे मात करू शकतो आणि आपण कसे फिट राहू शकतो,याचे सहजपणे प्रात्यक्षिक स्वरूपात महत्त्व पटवून सांगितले.अलिकडच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या ना कुठल्या तसेच अनोख्या व्याधीने ग्रस्त व त्रस्त आहे. प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली ही यासाठी कारणीभूत आहे. या गतीमान जीवनशैलीत कुणालाही आपण तंदुरूस्त राहण्यासाठी म्हणजेच स्वतःसाठी अर्धा ते दीड तास देता येत नाही. आपण शरीराकडे दुर्लक्ष केल्याने शेवटी हॉस्पिटलशिवाय पर्याय नसतो.
याचा विचार करून आमच्या ‘स्ट्रेचिंग स्टुडिओ’ संस्थेने एक शास्त्रशुध्द सरळ कार्यक्रम तयार केला आहे. आम्हाला प्रत्येक घर हासरे, उत्साही व निरोगी बनवायचे आहे. यासाठी घरातील सहा वर्षे वयाच्या मुलापासून ८० वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वार्थाने सक्षम करण्याचा व त्यास तणावमुक्त करण्याचा छोटा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात योग प्रतिज्ञेने करण्यात आली.
फक्त २१ जून लाच आपण व्यायाम करायचा पण ईतर दिवशी आपण व्यायाम करायचा नाही किंवा करत नाही याकरिता सर्वप्रथम योगा व्यायामाची शपथ/प्रतिज्ञा घेऊनच सुरूवात करण्यात आली ती अशी की,आजपासून आम्ही दररोज दिवसातून ३० मिनिटे ते १ तास हा योगा व्यायामासाठी न चुकता देऊ.
सर्वांनी ही शपथ/प्रतिज्ञा एक मताने घेऊन माणसाच्या शरीरात लवचिकतेऐवजी ताठरपणा आल्याचे लक्षात घेऊन लवचिकतेचे आणि श्वसनाचे व्यायाम घेण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अभिनंदन छाजेड यांनी केले. यावेळी मुख्य अतिथी श्री. महावीरजी कर्नावट,सौ. प्रियाली कर्नावट,सौ. डॉ. शितल ओस्तवाल,सौ. कविता भंडारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. गणेश मुथ्था यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आपण सर्व जण सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल श्री. अभिनंदन छाजेड (भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड जैन महासंघ कार्यकारिणी सदस्य) यांच्या तर्फे सर्व नागरिकांचे, मान्यवरांचेआणि ज्येष्ठ पत्रकारांचे मनापासून धन्यवाद आणि हार्दिक आभार



