माणुसकी प्रतिष्ठानचे कार्यकारी सदस्य व डिजिटल स्किल्स चे संचालक हर्षल कदम यांनी वेबसाईट डेव्हलपमेंट व पायथॉन सोबत डाटा सायन्स हा कोर्स करण्याकरिता आलेल्या अंकिता मोरे या विद्यार्थिनीला माणुसकी प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याने तब्बल 25 हजार रुपयांची सवलत देऊन कोर्स पूर्ण करण्यास सहकार्य केले. माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी डिजिटल स्किल्स अलिबागचे आभार मानत ज्या गरजूंना अद्यायावत शिक्षण घेऊन नोकरी करायची आहे त्यांना डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक्स डिझायनिंग, अडव्हांस एक्सेल या कोर्सेस चा खूप फायदा होणार असल्याचे सांगितले तसेच
गरजू व गरीब विद्यार्थ्यांनी माणुसकी कार्यालयास संपर्क साधून सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.



