संपर्क बालग्राम बांधण पोयनाड येथे माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र या सामाजिक संस्थेकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित सर्व बालकांचे व तिथे कार्यरत अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान मोफत औषध उपचार करून योग्य तो सल्ला देण्यात आला.
माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हूलवान यांनी प्रत्येकानी स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच व्यायाम करून शरीर सुदृढ ठेवण्याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. यावेळी माणुसकी प्रतिष्ठान कार्यकारी सचिव सुमित राऊळ उपस्थित होते. बालग्राम बांधण कडून अर्चना दीक्षित यांनी उपस्थितांचे आभार मानत शिबिराची सांगता केली.



