दि. १४/०५/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाशजी सकुंडे (सल्लागार सदस्य, अल्पसंख्याक आयोग दिल्ली, भारत सरकार) यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आण्णा भाऊ साठे रंगमंदिर,येरवडा येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच गरजू महिलांना मोफत साडी वाटप व यावेळी समाजात सामाजिक काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्तेचा “समाज भुषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष,भारतीय जैन संघटना, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड जैन महासंघ कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. अभिनंदन धनंजय छाजेड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री. अविनाश माने, भारतीय जैन संघटनेचे सहकोषाध्यक्ष श्री. मोनिश गादिया, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी महाराष्टातून अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम आयोजित केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व धन्यवाद …



