विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, ॲनिमेशन फॅक्टरी खडकी च्या माध्यमातून आज शनिवार दिनांक ८ एप्रिल 2023 रोजी भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ 300 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शवला . स्पर्धेचे उद्घाटन अमिनेशन फॅक्टरी खडकी चे वरिष्ठ महाप्रबंधक श्री संजय हजारी साहेब यांच्या हस्ते झाले यावेळेस ॲनिमेशन फॅक्टरीचे प्रशासकीय अधिकारी के के मौर्या साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष शशिकांत निकाळजे, सचिव रवींद्र गवळी, कार्याध्यक्ष सुनील कांबळे आणि कोषाध्यक्ष जितेंद्र पारधे व्यासपीठावर उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी मॅन्युअल दास, शैलेश गजभिये, बसलीग शिवशरण, प्रमोद मोरे, उमेश कोचुरे ,मनोज खैरे आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 9 एप्रिल रविवार रोजी सायंकाळी पाच वाजता ज्युनिअर स्टाफ क्लब रेंज हिल्स या ठिकाणी आयोजित केला आहे. बुद्धिबळ स्पर्धेसाठी बक्षीस रुपये पन्नास हजार एकूण रक्कम आहे .जयंती महोत्सव समितीचे हे ६० वे वर्ष असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात.



