पिंपळे गुरव येथे राष्ट्रसंत आचार्य सम्राट प.पु. आनंदऋषिजी म.सा. यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड जैन महासंघ अंतर्गत श्री महर्षि आनंद युवा मंचातर्फे घेण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबीर,दंत चिकित्सा तपासणी शिबीर आणि मोफत औषधे व टुथपेस्ट वाटप व स्त्री रोग यावर मोफत मार्गदर्शन व स्त्री रोग औषधे वाटप,जनरल आरोग्य तपासणी ई.सी.जी. सह या महाआरोग्य शिबीर तपासणी शिबीरास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
राष्ट्रसंत आचार्य सम्राट प.पु. आनंदऋषिजी म.सा. यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त आणि श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त
राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री. प.पु. आनंदऋषिजी म. सा. यांचे शिष्यरत्न, धर्मप्रभावक, वाणीभुषण प. पु. प्रशांतऋषिजी म.सा. आदि ठाणा १ यांच्या सान्निध्यात आणि त्यांच्या प्रेरणेने व कृपार्शिवादाने पिंपरी चिंचवड जैन महासंघ अंतर्गत व *श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप (आमदार,भारतीय जनता पार्टी,चिंचवड विधानसभा), *श्री. शंकरशेठ पांडुरंग जगताप (निवडणूक प्रमुख,भाजपा,चिंचवड विधानसभा,मा. नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका), *श्री. महेशदादा दत्तात्रय जगताप (स्वीकृत नगरसेवक, *भारतीय जनता पार्टी,पिंपरी चिंचवड महानगरपालिका) यांच्या संयुक्त विद्यमानाने रामनवमीचे औचित्य साधून दि. ३० मार्च २०२३, गुरुवार, वेळ सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत श्री महर्षि आनंद युवा मंच, श्री वर्धमान जैन श्रावक संघ व जय आनंद महिला मंडळ, पिंपळे गुरव यांच्या वतीने भामाशाह श्री. रसिकलाल माणिकचंद धारीवाल स्थानक भवन,भीमाशंकर काॅलनी, रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ, पिंपळे गुरव, पुणे -४११०६१. येथे मोफत नेत्र चिकित्सा तपासणी शिबीर,मोफत दंत चिकित्सा तपासणी शिबीर आणि मोफत औषधे व टुथपेस्ट वाटप व स्त्री रोग यावर मोफत मार्गदर्शन व स्त्री रोग औषधे वाटप, तसेच मोफत जनरल आरोग्य तपासणी ई.सी.जी. सह या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबीराचे शुभारंभ धर्मप्रभावक वाणीभुषण प.पु. प्रशांतऋषिजी म.सा. यांच्या प्रेरणेने व कृपार्शिवादाने नवकार महामंत्र जप व मंगलपाठ करून सूरु करण्यात आले.
सदर शिबीराला पिंपळे गुरव,पिंपळे सौदागर,सांगवी,दापोडी, कासारवाडी, औंध विभागातील ज्येष्ठ नागरिक, पुरूष वर्ग, महिला वर्ग यांनी लक्षवेधी उपस्थिती दर्शविली होती व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सदर शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद दिला.सदर शिबीराची संख्या १२५-१५० इतकी होती.
सदर शिबीराला श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप (आमदार,भारतीय जनता पार्टी,चिंचवड विधानसभा),पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. डॉ. अशोककुमार पगारिया सर (सी.ए.) , राष्ट्रीय उपाध्यक्ष ऑल इंडिया जैन काॅन्फरन्स (नवी दिल्ली) ,सांगवी पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. श्री. रविंद्र गावंडे सर, पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे अध्यक्ष श्री. उमेश पाटील,कासारवाडी जैन स्थानकाचे युवा अध्यक्ष व पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. श्रेयस पगारिया, पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे उपाध्यक्ष श्री. संदीप फुलफगर, श्री. सुरेश गादिया (कासारवाडी), पिंपळे गुरव जैन स्थानकाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री. सुरेश धाडीवाल सर, सौ. सज्जना धाडीवाल (पिंपळे गुरव),
श्री. सुभाषलालजी मुथ्था (पिंपळे गुरव), श्री. सुभाष मुथियान (पिंपळे गुरव), दापोडी जैन स्थानकाचे अध्यक्ष व पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे उपाध्यक्ष श्री. दिलीप भन्साळी, श्री. सुनील कोठारी (दापोडी), श्री. राजेंद्र बाठिया (पिंपळे गुरव), पिंपळे गुरव जय आनंद महिला मंडळ अध्यक्षा सौ. सविता बाठिया, क्रीडावेध महाराष्ट्राचा संपादक श्री. सतिश बांदल आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर शिबीराला
डॉ. आगरवाल आय हॉस्पिटल, पिंपळे सौदागर
डॉ. अक्षय बडरेशिया
डॉ. निखील गुमपाली
डॉ. प्रतिक्षा जाधव
डॉ. मुथ्था डेंटल क्लिनिक, कृष्णा चौक, नवी सांगवी
डॉ. योगेश मुथ्था
डॉ. ज्ञानेश्वरी केदार
फेमी नाईन क्लिनिक,कृष्णा चौक, नवी सांगवी
डॉ. रुपाली मुथ्था
झिफीटेक डिजिटल हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड
झोनल मॅनेजर:- श्री. कुणाल शहा
श्री. सर्जेराव दाभाळे
श्री. शुभम सरवदे
श्री. करण कांबळे
या सर्व हाॅस्पिटल, क्लिनिक, हेल्थकेअर कंपनी तसेच अनुभवी व तज्ञ डॉक्टरांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले.
तसेच सदर शिबीराचे आयोजन श्री महर्षि आनंद युवा मंच पिंपळे गुरव व पिंपरी चिंचवड जैन महासंघ कार्यकारिणी सदस्य श्री. अभिनंदन छाजेड, श्री. गणेश मुथ्था, श्री. रविंद्र गांधी, श्री. मंगेश मुथ्था, श्री. मुकेश मुथियान यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले व सदर शिबीराला यांचे विशेष व उत्कृष्ट सहकार्य मिळाले. तसेच सदर शिबीराला श्री. महेशदादा जगताप , श्री. प्रा. सुरेश धाडीवाल सर यांनी उत्कृष्ट सहकार्य आणि मार्गदर्शन केले.
आपणा सर्व हाॅस्पिटल, मान्यवरांचे, नागरिकांचे आणि ज्येष्ठ पत्रकारांचे श्री. अभिनंदन छाजेड पिंपरी चिंचवड जैन महासंघ कार्यकारिणी सदस्य यांच्याकडून मनापासून धन्यवाद आणि आभार



