दिनांक 30 मार्च 2023 रोजी गुरुवारी दुपारी 3 ते 7 या वेळेमध्ये उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेकडून महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी 58 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला, मुंबईवरून अस्थिरोग तज्ञ तसेच हृदयरोग विकार तज्ञ व अलिबाग मधून स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ व इतर मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. आरोग्य तपासणी करता श्री सिद्धी साई संस्थानचे अध्यक्ष दीपक राऊळ व पानसरे गुरुजी यांनी सहकार्य केले. या सामाजिक कार्यात उज्ज्वल संपूर्ण टीम , विविध सामाजिक संस्था व पदाधिकारी उपस्थित होते.
दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सर्व भाविक व परिसरातील ग्रामस्थांकरिता मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे असे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा यांनी घोषित केलं.



