दि.२० मार्च २०२३ रोजी अलिबाग क्रिडा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पि.एन.पी. शाळा, वैश्वि येथे खेळाडुंच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध संगीतकार, दिग्दर्शक आणि पी.एन.पी. शाळेचे ट्रस्टी विक्रांत वार्डे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते. स्पर्धेमध्ये ना.ना.पाटील हायस्कूल पोयनाड संघाने विजेतेपद मिळविले व उपविजेतेपद पि.एन.पी. शाळा वेश्वी संघाने मिळविले. १४,१६,१९ वर्षांखालील अशा विविध गटांमध्ये घेण्यात आली. स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडुंना पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. विजेत्या संघांना चषक देण्यात आले. कबड्डी असो.चे सदस्य तेजस म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा खेळविण्यात आली.
अंतिम दिवसाच्या कार्यक्रमातील फुटबॉल, खोखो आणि व्हाॅलिबाॅल स्पर्धांची सुरुवात रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यालयाच्या भव्य मैदानावर करण्यात आली. या स्पर्धांचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी शहरातील जेष्ठ नागरीक माजी मुख्याध्यापक आणि लायन ऍड अंकित बंगेरा, पोलीस क्रीडा प्रमुख ऋषीकेश साखरकर उपस्थित होते. या तिन्ही स्पर्धांना खेळाडु पालक वर्ग तसेच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. श्रेयश पाटील आणि त्यांच्या टीमने फुटबॉल स्पर्धेचे अत्यंत दिमाखात नियोजन केले.
व्हाॅलिबाॅल स्पर्धा देखिल तेवढ्याच उत्साहाने खेळविण्यात आली. व्हाॅलिबाॅल स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल प्रथम . आर सी एफ स्कूल कुरुळ द्वितीय आणि
के इ इस अलिबाग तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले. मुलींमध्ये जे एस एम अलिबाग प्रथम सेंट मेरीज स्कूल अलिबाग द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले. नामवंत क्रीडा शिक्षक यतिराज पाटील या स्पर्धेचे नियोजन पाहीले.
प्रचंड उष्णता असून देखील ईतर सर्व स्पर्धांप्रमाणेच खोखो स्पर्धा देखिल तेवढ्याच चुरशीने खेळली गेली खोखो स्पर्धेमध्ये हाशिवरे संघाने विजेतेपद पटकावले. आशिष पाटील, राकेश म्हात्रे यांनी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.
महिलांची लेदर बाॅल क्रिकेट स्पर्धेचा समारोप कामगार नेते जितेन्द्र गोंधळी यांच्या हस्ते करण्यात
एन.एस.सी. क्रिकेट संघाच्या खानाव येथील सुसज्ज मैदानावर अलिबाग क्रिडा महोत्सवा चे सदस्य संदीप जोशी , हुसेन तांबोळी यांनी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी खुशी भरती नाबाद 69 धावा 37 चेंडू, स्वरा खेडेकर 33 धावा 25 चेंडू 2 षटकं 2 धावा 4 बळी, प्रांजल 36 धावा 20 चेंडू, तानीषा 46धाव 34 चेंडू, वैभवी 18 धावा 12 चेंडू, अंजली 18 धावा 14 चेंडू, निशिता विटलाणी 4 षटकं 17 धावा 2 बळी यांनी केले.
अलिबाग सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव अंतर्गत आज आरसीएफ स्कूल मध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे उदघाटन समारंभ वकील श्रीम.संध्या सुभाष कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे आरसीएफ स्कूल मुख्याध्यापिका जाधव , माणुसकी प्रतिष्ठान ,पदाधिकारी रेखा पाटील आणि उज्वला चंदनशिव , क्रीडा शिक्षक भगत , आणि रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष विलास म्हात्रे यांचे उपस्थित पार पडला. बुद्धिबळ स्पर्धेत 13 वर्ष गटात 32 जणांनी, 17 वर्ष गटात 27 जणांनी तर 19 वार्ष खालील गटात 14 जणांनी अशी एकूण 73 नावे नोंदली होती. स्पर्धा साखळी पद्धतीने 5 फेऱ्या त घेण्यात आल्या.
बुध्दिबळ स्पर्धेमध्ये कु बलकवडे या आंतरराष्ट्रीय फीडे रेटिंग प्राप्त खेळाडुचा सहभाग होता. बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य बुध्दिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रें आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. बुध्दीबळ स्पर्धेचा बक्षीस समारंभ आणि अलिबाग कला क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी आर.सी. एफ. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम जाधव आर. सी. एफ. प्रशासकीय अधिकारी भालचंद्र देशपांडे, संतोष वझे, महेश पाटील माथाडी सोसायटी चेअरमन नामदेव कटरे, व संपूर्ण माणुसकी टीम उपस्थित होती.
विद्यार्थ्यांसोबतच पालकवर्ग देखील प्रचंड संख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे नीटनेटके नियोजन, सुसुत्रता, परीक्षांचा कालावधी असताना देखिल शाळांनी दीलेला प्रतिसाद याला भालचंद्र देशपांडे यांनी भरभरुन दाद आपल्या भाषणात दीली. संतोष वझे यांनी माणुसकी प्रतिष्ठान आणि रायगड प्रिमियर लिग सुरभी स्वयंसेवी संस्थेतर्फे अत्यंत कमी वेळात सर्व स्पर्धांचे विना व्यत्यय नियोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. अशाच स्पर्धा जिल्हा पातळीवर खेळविण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन तिन्ही पदाधिकाऱ्यांनी केले.
माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी स्पर्धा कशी घडली याबद्दल माहिती देत सर्वांचे आभार मानले. माणुसकी, सुरभी संस्थेचे, आर्.पि.एल.चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आले. समारंभाचे सुत्रसंचालन संदीप वारगे यांनी उत्तमरीत्या केले. माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान रायगड प्रिमियर लिग सचिव जयंत नाईक , सुरभी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे यांनी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येक संस्थेचे , क्रिडा प्रशिक्षक व कार्यकर्त्यांचे, सहभागी खेळाडुंचे , प्रेक्षक वर्गांचे आणि महोत्सवाचे मुख्य पुरस्कर्ते आर.सी.एफ चे आभार मानले. आणि पुढील महोत्सव – दुसरे पर्व येत्या वर्ष अखेरीस करण्याचा मनोदय व्यक्त केला.



