दिनांक 8/3/ 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेकडून श्री समर्थ वृध्दाश्रम परहुर येथे साडी वाटप.
उज्ज्वल भविष्य संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. उज्ज्वला चंदनशिव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांनी महिलांचा आदर केला पाहिजे, वृध्द महिला ह्या आपल्या कुटुंबाचा भाग आहेत त्यांचा सन्मान करणे आपल कर्तव्य आहे असे सांगत वृध्दाश्रम हे आपले घर आहे समजून सर्वांनी मिळून आनंदाने राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सचिव संदीप वारगे, श्रीम. रेखा पाटील, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, संदेश गुंजाळ, कवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ राजाराम हुलवान यांनी सर्वांच्या आरोग्याची विचारपूस करत मानसिक आधार दिला.
वृध्दाश्रम संचालक संदेश गुंजाळ यांनी येणाऱ्या कठीण प्रसंगाला तोंड देत ही संस्था चालू आहे , व सर्वांना सहकार्याचे आवाहन केले व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



