कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिचा सत्कार केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादापाटील कोल्हापूरचे पालकमंत्री केसरकर साहेब यांच्या उपस्थितीत.
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी सांगता समारंभ निमित्त न्यू एज्युकेशन सोसायटी च्या विमला गोइंका इंग्लिश मीडियम स्कूल ची माझी विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का पाटील चा सत्कार केंद्रीय गृह मंत्री माननीय अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांच्या पत्नी सोनल अमित शहा यांच्या हस्ते झाला. अनुष्काने आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यू एज्युकेशन सोसायटीचे नाव चमकाविलेले आहे. अनुष्का ने या अगोदर जागतिक ज्युनिअर नेमबाजी स्पर्धा जर्मनी तसेच आशियाई नेमबाजी स्पर्धा इराणी येथे भारताला नेमबाजी मध्ये सुवर्णपदक मिळवून दिलेले आहे . नुकत्याच भोपाळ येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तिने 50 मीटर फ्री पिस्तल गटात एक सुवर्ण व एक कास्यपदक मिळविले . तसेच विविध क्रीडा प्रकारात 8000 खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या पुणे येथे झालेल्या राज्य ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कास्यपदक मिळविले .नेमबाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करत तिने आत्तापर्यंत विविध राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळून 108 पथकांची कमाई केलेली आहे.कोल्हापूरचे चे खेळाडू शूटिंग विश्व गाजविण्यास सज्ज झाले आहेत हेच अनुष्काने दाखवून दिले .अनुष्का ने कोल्हापूरच्या खेळाडूंचा नेमबाजीतील दबदबा कायम ठेवला. अनुष्काच्या या सातत्यपूर्ण नेमबाजीतील कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री केसरकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा पार पडला
अनुष्काला न्यू एज्युकेशन सोसायटीचे लोहिया सर ,सप्रे सर, वसंत पाटील सर ,गोइंका सर यांचे मोलाचे मार्गदर्शन होत आहे .अनुष्का कोल्हापूर येथील गोखले कॉलेज येथे बीएससी कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेते तिला उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रोत्साहन लाभले आहे .अनुष्का पुणे क्रीडा प्रबोधिनीची अनिवासी खेळाडू आहे. तिला प्रबोधिनीचे प्राचार्य सुहास पाटील,नवनाथ फडतरे, संदीप तरटे, जी एफ जी ऑलम्पिक खेळाडू गगन नारंग, प्रशिक्षक सी.के.चौधरी ,अब्दुल कय्युम ,विनय पाटील, युवराज चौगुले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.



