Kridavedhnews

डॉक्टरांसाठी कानमंत्र.. फिटनेससाठी मैदानी खेळ आवश्यक.. डॉ राजाराम हुलवान

कर्जत मेडिकल असोसिएशन आयोजित केएम्ए फ्रेंडशिप कप २०२३ ह्या डॉक्टरांसाठी टेनिस क्रिकेट स्पर्धेत बोलताना अलिबाग संघाचे डॉ राजाराम हुलवान ह्यांनी
डॉक्टरांच्या आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळण्याची गरज असल्याचा कानमंत्र दिला.
कर्जत मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ नितीन भोपतराव यांच्या नेतृत्वाखाली डॉ प्रशांत गांगल, डॉ निलेश म्हात्रे, रायगड मेडिकल असोसिएशनची डॉक्टर प्रिमियर लिग ची कल्पना प्रथम २००५ मध्ये प्रत्यक्षात आणणारे कर्जत मेडिकल असोसिएशन चे संस्थापक सदस्य डॉ आशुतोष कुलकर्णी आणि कॅबिनेट सदस्य ह्यांनी ह्या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. अलिबाग,बदलापूर, कल्याण आणि कर्जत येथील प्रतिथयश डाॅक्टरांच्या संघानी यात सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात बदलापूर संघाने फ्रेंडशिप कप जिंकला. यजमान कर्जत संघ उपविजेता ठरला. मॅन ऑफ द सिरीज डॉ कुलदीप इंगोले,स्पर्धेतील उत्तम गोलंदाज म्हणून डॉ विनय सांगळे, उत्तम फलंदाज म्हणून बदलापूर चे डॉ आशीष यादव यांना पुरस्कार मिळाला.
तसेच कर्जत महिला डॉक्टरांचे बाॅक्स क्रिकेट चे सामनेही आयोजीत करण्यात आले होते.
यावेळी रत्नराज नर्सिंग होमचे डॉ प्रेमचंद जैन, मातोश्री हाॅस्पिटलचे डॉ दिग्विजय पवार, डॉ विलास सरोदे, डॉ हेमंत शेवाळे, रायगड मेडिकल असोसिएशनचे इलेक्ट प्रेसिडेंट डॉ निशिगंध आठवले, केएम्ए माजी अध्यक्षा डॉ शर्वाणी कुळकर्णी आणि कर्जत मधील अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio