दिनांक 02/02/23 रोजी माणुसकी प्रतिष्ठान शाखा खंडाळे येथील माणुसकी सदस्या मंजुश्री शंकर शिंदे यांनी माणुसकी शाखा खंडाळे अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पती कै. शंकर शिंदे यांच्या तिसऱ्या स्मृतिदिना निमित्त श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम परहुर येथे अन्नदान केले.
वृध्दधाम मधील वृद्धांना माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी भेट देऊन अन्नदान आणि मोफत औषधे दिली. तसेच तेथील उपस्थितांना आरोग्याची काळजी व चिंतामुक्त राहण्यास सांगून प्रत्येक महिन्याला आरोग्यतपासणी करन्याकरिता येणार असे सांगितले.
श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम परहुरचे ॲड. जयेंद्र गुंजाळ यांनी अन्नदान व औषधे वाटप केल्याबद्दल आभार मानले.
यावेळी माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबागचे संपर्क प्रमुख ॲड. भुपेंद्र पाटील उपस्थित होते.
जर शक्य असल्यास अशीच प्रत्येकाने संकल्पना राबवली तर गरजूना थोडीतरी मदत होईल. एवढीच एक अपेक्षा माणसांकडून गरजू माणसांकारिता……



