आज दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवड्याची सुरुवात, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड डॉ. किरण पाटील सर यांच्याद्वारे महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तसेच अलिबाग शहरांमध्ये पाच किलोमीटर अंतराची मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात सुद्धा माननीय डॉ. किरण पाटील सर यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली, या स्पर्धेमध्ये भरपूर विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग नोंदवला व स्पर्धा पूर्ण केली, याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉ. अशोक कटारे सर, माननीय सहायक संचालक कुष्ठरोग रायगड डॉ. प्रताप शिंदे सर,समुदाय आरोग्य अधिकारी ,श्री भगवान जाधव अवैद्यकीय सहाय्यक, श्री राजकुमार गाजुलवार नीम वैद्यकीय कर्मचारी ,कनिष्ठ लिपिक श्री तेजस मोरे ,श्री शशिकांत शिर्के, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन कार्याध्यक्ष जयंत नाईक, यतीराज पाटील, उपस्थित होते.
माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान व माणुसकी टीम यांचे मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले. माननीय सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. प्रताप शिंदे सर यांनी सर्वांना कुष्ठरोगाबाबत जनजागृती विषयी माहिती दिली व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्रक देण्यात येऊन बँकेचे पासबुक ची फोटो प्रत ऑफिसमध्ये जमा करण्यास सुचवले जेणेकरून विजेत्यांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करता येईल शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले. तसेच सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माणुसकी प्रतिष्ठानच्या वतीने प्रशस्तीपत्रक देण्यात आले.



