पालघर मुंबई येथे अंडर 19 वयोगटातील खेळाडूंच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या.
खेलो इंडिया बॉक्सिंग सेंटर पालघर येथे सलग तीन दिवस या स्पर्धा चालू होत्या यामध्ये राज्यातील आठ विभागांमधून 200 खेळाडू यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये 19 वयोगटातून पिंपरी चिंचवड मधील अथर्व राजपूत हा सुवर्ण पदक विजेता ठरला तसेच राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी देखील पात्र ठरला.
संपूर्ण शहरातून त्याच्यावरती शुभेच्छा च्या वर्षाव होत आहे.
साप्ताहिक क्रीडावेध महाराष्ट्राचा परिवारातर्फे अथर्व रजपूत तसेच विविध वयोगटातील पदक विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन



