रायगड: दिनांक १०जानेवारी २०२३ रोजी ५०वे अलिबाग तालुका विज्ञान प्रदर्शन स.म.वडके विद्यालय चोंढी येथे आयोजित करण्यात आले होते. मा. श्रीम. शुभांगी नाखले उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती अलिबाग यांच्या शुभहस्ते आदर्श शाळा वायशेतच्या विद्यार्थ्याचे राष्ट्रीय स्तरावरील उपग्रह निर्मिती मोहिमेमध्ये तीन विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल मोनिका बाबर, बबिता चव्हाण, करण जाधव व मार्गदर्शक शिक्षक तथा जिल्हा आदर्श शिक्षक श्री संदीप वारगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विज्ञानाचा जादूगार म्हणून वारगे सरांचे खास कौतुक झाले. सोबत प्र. केंद्र प्रमूख संतोष गावंड सर उपस्थित होते. तसेच सन २०२२ या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन बक्षिस वितरण समारंभ करण्यात आला. शिक्षक प्रतिकृती साठी संदीप वारगे प्रथम क्रमांक व विद्यार्थी प्रतिकृती साठी मोनिका बाबर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी अति. गटविकास अधिकारी मंगेश पाटील, गट शिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा, विज्ञानमंडळाच्या प्रमूख वैशाली पाटील, संस्थेचे मुख्याध्यापक संदीप पाटील, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



