रविवार दि 25/12/22 रोजी माणुसकी प्रतिष्ठान शाखा सासवणे आयोजित मोफत आरोग्य शिबिर शिबिरास 150 हून अधिक लोकांनी सहभाग दर्शविला. हे शिबिर माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र, लायन्स क्लब मांडवा, लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग व सासवणे ग्रामपंचायत यांच्या सहयोगाने राबविण्यात आले. यावेळी मुंबईचे सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. राहुल शर्मा, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान डॉ. शाहिदा अन्सारी, डॉ. प्रज्योत पाटील उपस्थित होते. या शिबिरात अस्थिरोग, नेत्ररोग, जनरल तपासणी, बोन मॅरो डेन्सिटी, मधुमेह तपासणी तसेच निसर्गोपचार आदी करण्यात आले. माणुसकी प्रतिष्ठान सासवणे अध्यक्ष अश्विनी वर्तक यांनी सर्व उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.



