श्री. वि. रा. मिश्रा हे सामाजिक आणि संत साहित्यावर भाष्य करणारे अभ्यासू लेखक आहेत. अमृताचे बोल या पुस्तकात आपले उपास्थ दैवत भगवंत पांडुरंगाला स्मरून देवी भक्ती कशी असावी याचे सखोल चिंतन त्यांनी मांडले आहे. लेखक वाचकाला भक्तीची महती वर्णन करताना मुक्तीची द्वारे खुली करीत आहे निदर्शनास येते. त्यामुळे हे अमृताचे बोल अनमोल आहेत असे मला वाटते.
माझी अभंगगाथा व सार ह्या जीवनाचे या पुस्तकातून लेखक वि. रा. मिश्रा जीवनाला उपयुक्त अशी अभंग राहणारे काव्यसुमने वाचकाला समर्पित करतात.
लेखक प्रबोधनातून साक्षात्कार या पुस्तकातून साधकाच्या जीवनात चमत्कार घडविण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील आहे. संतांचे आचार, विचार आणि उच्चार याची योग्य पद्धतीने सांगड घालून जीवनात जन्माला येऊन फक्त मरून न जाता तरून कसे जाता येईल या संबंधी लेखक प्रबोधनात्मक वैचारिक मांडणी करताना दिसून येतात.
अशा अनेक पुस्तकातून लेखक, कवी श्री. वि. रा. मिश्रा यांच्या साहित्यातून अध्यात्मिक वैचारिक प्रगल्भता मराठी मनाला साद घालते.
लेखकाच्या भावी साहित्य प्रवासासाठी अनेक शुभेच्छा!
ह. भ. प. प्रशांत महाराज मोरे देहुकर



