रविवार दि. 25 /12 /2022 रोजी माणुसकी प्रतिष्ठान शाखा सासवणे चे भव्य उद्घाटन झाले
या कार्यक्रमाप्रसंगी माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र, लायन्स क्लब मांडवा तसेच लायन्स हेल्थ क्लब फाउंडेशन अलिबाग यांच्या सहयोगाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
यामध्ये सुमारे दीडशे रुग्णांनी सहभाग घेतला या आरोग्य शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, जनरल तपासणी, निसर्गोपचार पद्धतीने रुग्णांची तपासणी, मधुमेह तपासणी करण्यात आली.
माणुसकी प्रतिष्ठान शाखा सासवणे उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून सासवणे गावचे सरपंच संतोष गावंड माजी सरपंच सुष्मीता घरत, मुंबईचे सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ राहुल शर्मा, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, डॉ शाहिदा अन्सारी, डॉ प्रज्योत पाटील, डॉ कुडतलकर व टीम,माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबाग अध्यक्ष ऍड. भूषण जंजिरकर, माणुसकी प्रतिष्ठान शाखा खंडाळा अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिव व महिला सदस्य, माणुसकी मुख्य शाखेचे इतर पदाधिकारी, लायन्स क्लब मांडवा सेक्रेटरी सुमित पाटील व टीम उपस्थित होती.
डॉ. राहुल शर्मा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली. डॉ शर्मा यांनी गुडघ्यांच्या सांध्याचे अस्थिरोपण तसेच इतर मोठ्या शस्त्रक्रिया देखील गरजू व गरीब रुग्णांकरिता कमी दरात करून देण्याचे आश्वासन दिले.
सरपंच गावंड यांनी नवीन शाखेस शुभेच्छा देत गावातील गरजू लोकांनी या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा व सामाजिक कार्यात सर्वांनी पुढे रहावे असे आवाहन केले.
माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी सासवणे टीमला शुभेच्छा देत भविष्यात आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, क्रीडा, प्राणिमात्र, वृक्षारोपण अशा विविध सामाजिक कार्यक्रमाची योजना करून चांगली कामे करण्यास सांगितले.
माणुसकी सासवणे शाखेकडून सचिव स्नेहल देवलेकर, सदस्य दर्शन भगत व इतर सदस्यांनी कार्यक्रम पूर्णत्वास नेले.
माणुसकी प्रतिष्ठान सासवणे अध्यक्ष अश्विनी वर्तक यांनी सर्व ग्रामस्थ व प्रमुख उपस्थितांचे आभार मानले , माणुसकी सासवणे सदस्य धर्मेंद्र वर्तक यांनी उत्तमरित्या सूत्रसंचालन करीत कार्यक्रमाची सांगता केली.



