माणुसकी प्रतिष्ठान संस्थापक उपाध्यक्ष माजी सैनिक व रायगड पोलीस श्री सतीश कणसे यांच्या वाढदिवसानिमित्त
शनिवार दि. 17/12/2022 रोजी. सकाळी 7 वाजता
दत्त टेकडी थळ वायशेत येथे प्लॅस्टिक मुक्ति मोहीम राबविण्यात आली.
आताच दत्त जयंती निमित्त यात्रा होऊन गेली..असता, मंदिर परिसरापासून ते मंदिराचा पायथ्याच्या मेन रोड पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक व इतर कचरा साठलेला होता . सदरचे ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे नेहमीचे मॉर्निंग वॉक , माणुसकी ओपन जिम वापर तसेच इतर फेरफटका मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अशा धार्मिक ठिकाणी स्वच्छता मोहीम करणे गरजेचे आहे.
हाच उद्देश समोर ठेवून माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र, माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबाग, थळ ग्रामपंचायत, रायगड जिल्हा परिषद व ग्रामस्थ यांच्या सहयोगाने स्वच्छता करून 26 गोणी प्लॅस्टिक गोळा करण्यात आले.
सदर स्वच्छता मोहीमे मध्ये थळ ग्रामपंचायत सरपंच सुनील पत्रे, माणुसकी प्रतिष्ठान खजिनदार संतोष कणसे, संचालक सदस्य कृष्णा वाघमारे, शैलेश वर्तक, सनी, श्रीतेज, माणुसकी प्रतिष्ठान शाखा अलिबाग अध्यक्ष ऍड.भूषण जंजिरकर, ऍड.रोशनी ठाकूर, वायशेत चे सामाजिक कार्यकर्ते अविनाश म्हात्रे, तसेच दररोज मॉर्निंग वॉक करणारे, व स्थानिक नागरिकांनी स्वच्छता मोहीमे मध्ये सहभाग घेतला. माणुसकी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष तानाजी आगलावे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी वैयक्तिक स्वतःच्या घरातून प्लॅस्टिक वापर बंद केला पाहिजे व सर्वांना जे प्लॅस्टिक दिसेल ते रिसायकल साठी ग्रामपंचायत मध्ये पाठविण्याचे आवाहन केले. माणुसकी सदस्य ज्ञानेश्वर जावके यांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केली.
माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र



