ग्रेट व्हिजन स्कूल च्या वतीने निगडी पुणे येथे क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता, त्या मध्ये
विद्यार्थी व पालक यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवून पारितोषीक पटकाविले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिलास पुष्पहार फुले वाहून व क्रिडा साहित्यस श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सव चे
उद्घाटन advocate श्री बजरंग पवळे सर यांचे हस्ते करण्यात आले.
विद्यार्थी यांचा क्रीडा शपथ विधी संस्थेचे संचालक उमेश लोंढे यांनी पार पाडला.
मुख्याध्यापक सौ. प्रिती लोंढे यांच्या हस्ते विद्यार्थी व पालकांना पारितोषीक वितरण करण्यात आले….
तर शिक्षिका सौ. निलम पवळे यांनी आभार प्रदर्शन मांडले.
संस्थेचे अध्यक्ष श्री लोंढे यांनी जीवनातील क्रीडा चे महत्व निरोगी जीवन शैली कशी असावी, मोबाईल पासून होणारे
दुष्परिणाम याचे महत्त्व पटवून दिले.



