राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ज्येष्ठ कामगार नेते कैलासवासी भाई मनोहर जी कोतवाल साहेब यांची 107 वी जयंती साजरी या जयंतीनिमित्त बॅगिग प्लांटमध्ये प्रतिमा पूजन केले त्यावेळी आर सि एफ पदाधिकारी गोडबोले साहेब, शेंडे साहेब, नलवडे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते त्यांनी कामगारांना काम करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले तसेच नामदेव कटरे यांनी कामगारांना भाई मनोहर जी कोतवालांविषयी माहिती सांगितली त्यानंतर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बॅगिग प्लांट साफसफाई करण्यात आलि
त्यानंतर येथे काम करणाऱ्या माथाडी कामगारांनी श्री समर्थ कृपा वृद्धाश्रम परुरपाडा येथे भेट देऊन तेथे प्रतिमापूजनसाठी मुंबई ट्रांसपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सचिव निवृत्ती धुमाळ साहेब हजर होते त्यांनी सर्व कामगारांना भाई मनोहरजी कोतवाल साहेबान विषयी माहिती सांगितली तसेच सुर्वे साहेब व शिंदे साहेब ही उपस्थित होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नंतर तेथील वृद्ध व्यक्तींना तीन महिना पुरेल एवढे अन्नदान व राशन वाटप केले व त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली



