रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे झालेल्या 14 वर्षाखालील राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धेत उस्मानाबादच्या मुलींनी इतिहास रचत सुवर्णपदकाची कामगिरी कली.
जि.प.प्रा.शा.हिंगणगावच्या क्रीडांगणावर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सब ज्युनिअर मुले व मुली जिल्हा निवड चाचणी लावण्यात आली होती. त्यामधून 12 मुले व 12मुलींची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली . त्या मुलींच्या संघात संजना आवाड, स्वाती वाघमारे, प्रतीक्षा माळी, वैष्णवी कोळी ,वैष्णवी शिंदे ,नंदिनी शिंदे, जानवी गवळी, ज्ञानेश्वरी अभंग, संस्कृती गवार, श्रीदेवी सोपलकर व वैष्णवी माळी या मुलींचा समावेश होता.
राज्यस्तरीय स्पर्धा 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाल्या. यामध्ये उस्मानाबादच्या मुलींच्या संघाने सुरुवातीला गटातील स्पर्धेत ठाणे संघाचा 30- 0 औरंगाबाद संघाचा 20 -0तर यजमान रायगड संघाचा 20-0 ने पराभव करत गटात अव्वल स्थान प्राप्त करून उप उपांत्य फेरी गाठली. उप उपांत्य फेरीत सातारा संघाचा 20 -0ने पराभव केला व उपांत्य फेरीत अमरावती संघाचा 20-0 ने पराभव करून फायनल मध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यात त्यांना कडवी झुंज द्यावी लागली ती जिगरबाज कोल्हापूर संघाबरोबर. दोन्ही संघाकडून निर्धारित वेळेत दमदार कामगिरीचे प्रदर्शन झाले पण गोल करण्यात कोणत्याही संघाशी यश आले नाही. अतिरिक्त वेळेत ही दोन्ही संघाची गुण समसमान राहिल्याने नाणेफेकीचा कौल घेतला .त्यामध्ये उस्मानाबाद संघाने नाणेफेक जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले तसेच यातील काही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड लवकरच कळवली जाणार आहे.
या संघाला रग्बी जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष शरद गवार सर, अनिल शिंदे सर, निलेश माळी, ऋतुजा काटे यांनी मार्गदर्शन केले. या संघातील खेळाडू प्रशिक्षक व्यवस्थापक यांचे अभिनंदन क्रीडाप्रेमी नागरिक संजय घुले सर ,बाळकृष्ण भवर सर, हिंगणगाव शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर,गायकवाड सर, मोरे सर ,राजाभाऊ शिंदे सर व सुनील बोरकर सर यांनी केले.



