Kridavedhnews

Breaking News
satish bandalराष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….जिल्ह्यात महात्मा गांधी जयंती पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवातअलिबाग नगरपालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिरक्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानपुण्याचे उमेश लोंढे यांची इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन (इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान🇮🇷) यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधि म्हणून श्री उमेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.कृत्रिम तलावात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जननिर्मल गणेशोत्सव साजरा करू प्रदूषणाला आळा घालू –चौल बेलाई येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्नथळच्या विकासासाठी निसर्ग सुंदर थळ सामाजिक संस्थेची स्थापना

ऑटिस्टिक व डाऊन सिन्ड्रोम जलतरणपटूनची राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणादायी कामगिरी

प्रतिनिधी : ऑटिस्टिक व डाऊन सिन्ड्रोम जलतरणपटूनची राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणादायी कामगिरी
गुवाहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये श्री.राजाराम घाग चेअरमन (जलतरण) यांच्या नेतृत्वात खाली पुण्यातील S 14 गटातील सौमिल कोवाडकर, चिन्मय पाठक, ऋत्विक जोशी , हर्ष बाबर आणि ऋचा चितळे या विशेष मुलांनी आपापल्या वयोगटा मध्ये अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे.या पाच जलतरण पट्टूनी एकूण 14 पदकांची कमाई केली.त्यातील 6 सुवर्ण ,4 रौप्य आणि 4 कास्य पदके आहेत.
महाराष्ट्र पॅरा संघटनेचे श्री नंदकुमार नाळे अध्यक्ष पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन व श्री मुबारक तांबोळी सेक्रेटरी पॅरालिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशन नी विजेत्यांची भेट घेतली व अभिनंदन केलं.
जन्मतःच बौद्धिक आणि शारीरिक कमतरता घेऊनच जन्माला आलेल्या या मुलांना जिद्दीने वाढवताना त्यांच्या मध्ये अमुलाग्र बदल घडवून आणताना पालक, शिक्षक आणि समाज या सर्वांची जर उत्तम साथ असेल तर खूप काही घडू शकते याचे एक उदाहरणच आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही.
या ग्रुप मधील काही मुले स्वमग्न आहेत तर काही मुले डाऊन सिंड्रोम आहेत. प्रत्येक दिव्यांग प्रकारच्या मुलांना हाताळायची पद्धत वेगळी. पालकांना मुले वाढवतानासुद्धा वेगळ्या अनुभवातून जावे लागते. विशेष मुलांना वाढवताना किंवा त्यांना एखादी कृती करायला लावताना त्यातील सातत्य फार महत्वाचे असते. विशेष मुलं असताना त्यांच्या प्रगती साठी सुरवातीची काही वर्ष विविध गोष्टी त्यांच्या कडून करवून घेताना पालकांना मुलानं बरोबर बराच वेळ द्यावा लागतो. हे सर्व करताना आई वडिलांची एक वाक्यता असावी लागते.दोघांपैकी एकाने ठामपणे मुलाची जबाबदारी उचलणे आवश्यक असते.तर दुसरा दुसरी बाजू उत्तम सांभाळू शकतो. बऱ्याच वेळा विशेष मुलं ग्रुप ॲक्टिविटी मध्ये भाग घेऊ शकत नाहीत.अशा वेळी जलतरण हा वैयक्तिक व्यायम म्हणून उत्तम पर्याय असू शकतो. पोहणे या व्यायाम प्रकारचा मुलांच्या सर्वांगीण विकास मध्ये खूप फायदा झालेला जाणवतो. त्यांचा सावधपणा चांगला सुधारल्याचे जाणवते.सौमिल ,चिन्मय आणि हर्ष यांचे पालक सांगतात की ऑटीझम मुळे आलेली हायपर activity नियंत्रणात आणण्यासाठी जलतरणाचा उत्तम फायदा झाला.बरीचशी ऑटिस्टिक मुले शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असतात.परंतु त्यांना एकाग्रता नसणे, समन्वय नसणे, hyper activity तसेच काही वर्तन समस्या असतात या गोष्टीसुधरण्यासाठी काम करण्याची गरज असते .
ऋत्विक आणि ऋचा चे पालक सांगतात डाऊनसिंड्रोम मुलांचा muscle tone खूप कमुवत असतो तो सुधारण्यास जळतरणाचा खूप फायदा झाला आहे. Muscle tone कमकुवत असल्याने ग्रॉस मोटर activities करताना पण या मुलांना लहानपणी खूप अवघड जाते. त्यासाठी Physiotherapy द्यावी लागते.त्याच बरोबर लवकर swimming ची जर जोड दिली तर muscle tone सुधारायला नक्की फायदा होऊ शकतो. Posture सुधारायला मदत होते. जलतरण शिकवायला लागल्या पासून त्यांना पोहायला यायला लागे पर्यंत बराच काळ मधे जातो तेव्हा मुलांना नियमित पणाने एखादी गोष्ट करायला लावणे हे पालकांचे च काम आहे. पोहण्यामुळे मुलांची तब्येत पण चांगली राहू लागली.सतत होणारी सर्दी खोकल्याची infections खुप आटोक्यात आली असेही पालक सांगतात. तसेच स्पर्धेत भाग घेतल्याने मुलांमध्ये जबाबदारीची जाणीवही निर्माण होते.
शरीर सक्रीय राहिल्याने मुलांच्या इतर प्रगती मध्ये सुद्धा सकारात्मक बदल दिसतो.
पालकांशी बोलताना असे लक्ष्यात येते की मुलांना स्पर्धेत उतरवायचे म्हणजे थोड स्पर्धे आधी वेगळं coaching आवश्यक असतं. ही सर्व मुले वेगवेगळ्या तलावांवर पोहतात त्याच्या प्रशिक्षकांशी संवाद साधल्यावर तेव्हा हार्मनी Aquatic club चे प्रशिक्षक श्री.भूपेंद्र आणि श्री.नरेंद्र आचरेकर सर अस सांगतात की आम्ही विशेष मुलांना सर्वसामान्य मुलानसारखेच ट्रेनिंग दिले.त्यांना सर्वसामान्य मुलांच्या बॅचेस मध्येच घेऊन त्यांच्या बरोबर सर्व workout करायला दिला. त्यामुळे त्यांच्या मधे समूहात कसे वागावे याची जाणीव तसेच जबाबदारीची जाणीव वाढीस लागलेली दिसते.त्यांना ट्रेन करताना फारशी अडचण आली नाही असेही त्यांनी सांगितले. सौमिल तर सर्व workout अगदी इतर नॉर्मल मुलांबरोबर व्यवस्थित करू लागला आहे. या मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणेच जर आपण वागणूक दिली तर ते नक्की उत्तम प्रगती करू शकतात असे त्यांनी सांगितले.
टिळक टँक वरील प्रशिक्षक प्रबिर सर सांगतात की ऋत्विक सर्वसामान्य मुलां बरोबरच पोहतो आणि त्याला इतर मुलांप्रमाणेच सर्व workout दिला जातो आणि प्रत्येक सूचना तो काटेकोरपणे पाळत असतो. सौरभ देशपांडे सर सांगतात त्यांनी बऱ्याच विशेष मुलांना ट्रेन केलं आहे आणि लवकर swimming शिकवल्याने त्या मुलांच्या एकूण प्रगतीत खूप सकारात्मक बदल झाला आहे. या सगळ्या मधे पालकांचे सातत्य हे फार महत्त्वाचे आहे हे त्यांनी नमूद केले आहे. A.K. Group चे संचालक श्री अकुश कापडीया कोच श्री सुरज परदेशी व संजय सर यांनी हर्ष बाबर साठी खूप परीश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio