जैन चातुर्मास पर्व २०२२, पिंपळे गुरव निमित्त श्री महर्षि आनंद युवा मंचातर्फे जैन साध्वीजी सौम्य साधिका प. पु. पुण्यस्मिताजी म.सा. व ओजस्वी वक्ता प. पु. प्रणिधीजी म.सा. आदि ठाणा २, पिंपळे गुरव यांच्या सान्निध्यात व त्यांच्या कृपार्शिवादाने रसिकलाल माणिकचंद धारीवाल जैन स्थानक भवन, भिमाशंकर काॅलनी, पिंपळे गुरव येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका (वाय. सी. एम.), ह्युमन सक्सेस सोशल फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य), श्री. लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप (आमदार,भा.ज.पा. चिंचवड विधानसभा), श्री. शंकरशेठ पांडुरंग जगताप (निवडणुक प्रमुख,भा.ज.पा. चिंचवड विधानसभा,मा. नगरसेवक पिं.चिं. म.न.पा), श्री. महेशदादा दत्तात्रय जगताप (स्वीकृत नगरसेवक, भा.ज.पा. पिं.चिं. म.न.पा.) यांच्या संयुक्त विद्यमानाने “महारक्तदान आणि मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे” आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान व आरोग्य शिबीरात ज्युपिटर हाॅस्पिटल (बाणेर),आदित्य बिर्ला हॉस्पिटल (चिंचवड) ,वाय.सी.एम. हाॅस्पिटल (पिंपरी) व श्रद्धा क्रिटीकेअर हॉस्पिटल (पिंपळे गुरव) या नामांकित हाॅस्पिटल अंतर्गत विविध आरोग्य विषयी सेवा नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. सदर शिबीरामध्ये नेत्र चिकित्सा,दंत चिकित्सा,कान-नाक-घसा,थायरॉईड तपासणी, किडणी विकार, गुडघे प्रत्यारोपण,संधीवात, हाडांचे व मणक्यांचे आजार,पोटाचे आजार,स्त्री रोग,मेंदूचे विकार,हार्निया,मुळव्याध,त्वचारोग, लहान मुलांचे आजार, रक्तदाब, रक्तगट ,शुगर तपासणी (जनरल तपासणी) इत्यादी तपासण्यांचा समावेश होता. सदर शिबीराचे उद्घाटन
श्री. शंकरशेठ पांडुरंग जगताप (निवडणुक प्रमुख,भा.ज.पा. चिंचवड विधानसभा), श्री. महेशदादा दत्तात्रय जगताप (स्वीकृत नगरसेवक,भा.ज.पा. पिं.चिं. म.न.पा.) यांच्या हस्ते पिंपळे गुरव जैन स्थानकाचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रा. सुरेश धाडीवाल (सर), चातुर्मास अध्यक्ष श्री. सुर्यकांत बाफना,श्री. सुभाषजी मुथ्था,श्री. प्रदीपजी बाफना यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सदर शिबीरामध्ये श्री. अनिकेत काटे (स्विकृत नगरसेवक, पिं.चिं. म.न.पा.), श्री. राम बांगड (संस्थापक अध्यक्ष,रक्ताचे नाते ट्रस्ट,महाराष्ट्र राज्य, रक्तमित्र, जीवनगौरव, पुणे हिरो, सामाजिक समरसता मंच, महेश गौरव, महाराष्ट्र जन सन्मान या सर्व पुरस्काराचे मानकरी), श्री. भाग्यदेव घुले (विशेष कार्यकारी अधिकारी, भोसरी पोलीस शांतता कमिटी सदस्य), श्री. रविन्द्रजी बलाई (राष्ट्रीय कोषाध्यक्ष,जीवन प्रकाश योजना,ऑल इंडिया जैन काॅन्फरन्स,दिल्ली,अध्यक्ष पोलीस मित्र संघटना,औंध, रिपोर्टर सत्य पोलीस मित्र टाईम्स,एक्स रिपोर्टर ऑल इंडिया टीव्ही न्यूज), श्री. सतिश बांदल (वास्तुतज्ञ,संचालक, क्रीडावेध महाराष्ट्राचा न्यूज पेपर), श्री. विजय गायकवाड (सकाळ न्यूज पेपर), श्री. धर्मचंदजी फुलपगर (उपाध्यक्ष, पंचम झोन ऑल इंडिया जैन काॅन्फरन्स, दिल्ली), जनसेवक श्री. देवदत्त लांडे, श्री. सुरेशजी गादिया (कासारवाडी) आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबीराचे विशेष सहकार्य आणि आयोजन श्री. सुखानंद कांबळे (संस्थापक अध्यक्ष,ह्युमन सक्सेस सोशल फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) ),श्री. गणेश मुथ्था,श्री. अभिनंदन छाजेड,श्री. रवींद्र गांधी, श्री. आशिष काटे,श्री. प्रशांत कदम यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीरात पिंपळे गुरव,पिंपळे सौदागर,सांगवी,दापोडी, कासारवाडी,औंध विभागातील ज्येष्ठ नागरिक,पुरुष वर्ग, महिला वर्ग यांनी लक्षवेधी उपस्थिती दर्शविली होती. सदर शिबीरामध्ये श्री महर्षि आनंद युवा मंच, पिंपळे गुरव जैन श्रावक संघ आणि जय आनंद महिला मंडळ उपस्थित होते.
सदर शिबीराला श्री. शंकरशेठ जगताप,श्री. महेशदादा जगताप,श्री. प्रा. सुरेश धाडीवाल (सर),श्री. सुखानंद कांबळे यांनी उत्कृष्ट सहकार्य आणि मार्गदर्शन केले.
आपणा सर्व हाॅस्पिटल, मान्यवरांचे,नागरिकांचे आणि ज्येष्ठ पत्रकारांचे श्री. अभिनंदन छाजेड यांच्याकडून मनापासून धन्यवाद आणि आभार



