शिवम फाउंडेशन आयोजित पुणे शहर बॉक्सिंग संघटना मान्यतेने स्व.चेतन रवींद्र फटाले स्मरणार्थ भव्य जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा – २०२२ (जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम – पुणे) येथे झालेल्या स्पर्धेत कु.सोनिया सुर्यवंशी (KLVSP) हिने कु.संजना यादव (PCSF) हिचावर जोरदार प्रहार करत मात करून विजय संपादन केला.म्हणून कु.सोनिया सुर्यवंशी हिस बेस्ट बॉक्सर पुरस्कार मा. अविनाश बागवे (कार्याध्यक्ष – पुणे शहर बॉक्सिंग संघटना), मा.प्रकाश रेणूसे (कार्याध्यक्ष – शिवम फाउंडेशन),मा. मदन वाणी (सचिव – पुणे शहर बॉक्सिंग संघटना), मा.विजय गुजर (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच), मा.जयसिंगराव मोहिते (अध्यक्ष – शिवम फाउंडेशन), यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले.त्याप्रसंगी मा.रवींद्र फटाले (खजिनदार – शिवम फाउंडेशन), मा. सलमान शेख (शिव छत्रपती राज्य पुरस्कार विजेते), मा.मोहन गोस्वामी उपस्थित होते.शिवम फॉऊंडेशन पुणे आयोजित स्वर्गीय चेतन फटाले समरणार्थ जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा विक्रमी १५२ खेळाडूंच्या सहभागाने सुरू झाली.
स्पर्धेत अनेक माजी खेळाडूं प्रताप खंडागळे,संजीव गोडसे,शरद कंक,कटारिया,राकेश यादव आदींनी भेट देऊन नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन दिले व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेच्या सर्व सभासदांनी तसेच मा.अभिमन्यू सूर्यवंशी (सचिव – पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना), मा.कैलास गायकवाड (उपाध्यक्ष – पुणे शहर बॉक्सिंग संघटना), मा.अजित ओसवाल, मा.सुरेश गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य केले व मा.सूरज रेणुसे (सचिव – शिवम फाउंडेशन) यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पार पाडले.



