साप्ताहिक क्रीडावेध महाराष्ट्राचा प्रतिनिधी –
दीपावली तसेच स्वर्गीय आदरणीय किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीचे अवचित साधून दिनांक 23 ऑक्टोबर रोजी येवलेवाडी येथील कुष्ठरोग हॉस्पिटल येथे एक बार फिर किशोर दा या किशोर कुमार यांच्या गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन समाज प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट व वुमन्स लिबर्टी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते.
माननीय श्री. जयंत हिरे सर ह्यूमन राइट्स आणि माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच सौ. रूपाली वांबुरे मॅडम फाउंडर वुमेन्स लिबर्टी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने वरील कार्यक्रमाचे नियोजन झाले.
या कार्यक्रमास मुख्य उपस्थिती माननीय एम.डी. चौधरी राष्ट्रीय अध्यक्ष ह्युमन राइट्स असोसिएशन सरांची लाभली.
या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते यामध्ये श्री प्रकाश पाटील, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिनू मेहता अपंग उद्धार संस्था येवलेवाडी , श्री हेमंत वांबुरे ट्रस्टी हे उपस्थित होते. तसेच संजरी फाउंडेशन चे ईसा शेख, ज्येष्ठ लेखक माननीय विजय मिश्रा सर, कवी माननीय श्रीकांत भा. म्होकर सर, माननीय डॉक्टर अजय दुधाने सर, एनजीओ असोसिएशन, भाजप पुणे, अध्यक्ष, माननीय अनिल झेंडे सर, तसेच विविध राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने सर्व आजी-आजोबा या कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री जयंत हिरे सर यांनी ओळख सत्राने केली. आणि माननीय मोहन राठोड , व्हाईस ऑफ किशोरदा यांच्या गीताने सर्व वातावरण प्रसन्न होऊन गेले. कार्यक्रम चालू असताना विविध राजकीय मान्यवरांचे हजेरी लागत होत्या. तसेच कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे माननीय एम.डी. चौधरी सर यांनी आपल्या माऊथ ऑर्गन या इन्स्ट्रुमेंट ने लावणी सादर केली. तसेच त्यांनी एक गीत देखील सादर केले.
एक बार फिर किशोर दा या कार्यक्रमाचे मुख्य गायक श्री सतीश बांदल यांच्या मेरे नैना सावन भादो या गीताने सर्व प्रेक्षकांची तसेच मंचावरील उपस्थित सर्व व्यक्तींची मने जिंकली.
त्याचप्रमाणे या गीतांच्या कार्यक्रमाला दीपक महापुरे सर सचिन जाधव सर तसेच शंकर जगताप सर यांनी बहारदार गीते सादर केली.
तसेच याच कार्यक्रमात स्प्रेड हॅप्पीनेस आणि शिवराम तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने टी-शर्ट आणि मिठाई वाटपाचा कार्यक्रमही घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सौम्य महापत्रे यांनी फाउंडेशन ची माहिती तसेच कुष्ठरोगी या लोकांच्या सहानुभूतीसाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली.
श्री प्रकाश पाटील सर यांनी संस्थेची माहिती तसेच कुष्ठरोगी या व्यक्तींच्या संदर्भामध्ये विविध कार्याची माहिती दिली. आणि सर्वांचे आभार मानण्यासाठी जयंती हिरे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले सर म्हणाले की कुष्ठरोगी व्यक्तीच्या मनातील दुःख हलके करणारा हा कार्यक्रम आहे काही क्षण का होईना या सर्व लोकांना आनंदाचे क्षण उपभोक्ता आले संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा पाहून आणि उपस्थिती स्वतः असल्याने दोनही लेखक म्हणजेच माननीय विजय मिश्रा व श्रीकांत मोकर यांनी आपल्या लेखणीतून काही ओळी सादर केल्या.*
जाण असावी…*
शब्दही निशब्द होतात,
भाव नयनांतून पाझरतात
मने हळहळून जातात,
असे काही प्रसंग जेव्हा पाहण्यात येतात
नशीबही ज्यांना वेदनेचे आयुष्य देतात
आपलेही ज्यांना दूर लोटून देतात,
मरण येत नाही म्हणुन जे जगूनही रोज तिळ तिळ मरतात
शरीर साथ देत नाही,
आपल्यांचा आधार नाही,
अश्यांकडे पाहता क्षणी मन गहिवरून येते,
डोळे पाझरू लागते
त्यांच्या नातलगांविषयी प्रियजनांविषयी
त्यांच्या मूर्खपणेची निर्लज्जपणेची कीव येते आणि संतापही होतो
कळत नाही असे का ते वागतात,
माणुसजातीला कलंकित करतात
वेळ सांगून येत नाही,
आयुष्यात पुढे काय घडेल ठाऊक नाही,
तीच अवस्था आपलीही होऊ शकते
वाच्येने जरी ते काही बोलत नसतील
त्यांचे मन मात्र वेदनेने तळमळत असतं,
कळत नकळत ते बोलत असतं
जाण याची ठेवायला हवे
ते आजारी कुष्ठरोगी जरी असले तरी माणूसच आहेत हे जाणले पाहिजे
त्यांनाही माणसाप्रमाणे, आपणांप्रमाणे वागवले पाहिजे…
– वि. रा. मिश्रा
वृद्धाश्रमात राहून नेहमी
घरच्यांची आठवण येते ज्यांना
कुटुंब सुखासाठी तरसतात म्हणून
दिवाळी शुभेच्छा माझ्या त्यांना…
चालणाऱ्या माणसास पाहून
आजाराची जाणीव होते ज्यांना
पुन्हा पहिल्या सारखं चालता यावं
म्हणून शुभेच्छा माझ्या त्यांना…
दवाखान्यात चिंता छळते ज्यांना
कायमचं बरं वाटावं म्हणून
शुभेच्छा माझ्या त्यांना…
कधी खोट्या तर कधी फसव्या
आश्वासनाने रडवलं ज्यांना
आपल्यानंकडूनच सावध व्हावे
म्हणून शुभेच्छा माझ्या त्यांना…
थोड्या विरंगुळ्यासाठी गाणी
गायली किशोरदाची ज्यांना
दुःख थोडं विसरावं म्हणून
पुन्हा शुभेच्छा माझ्या त्यांना…
कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो
नियमित डॉक्टरी सल्याने औषधं
उपचार व्यायाम,आहार घेणे…
माझ्या सर्व कुष्ठरोगी माता,
बंधू आणि भगिनींना समर्पित… 🙏
श्री… ✍️
श्रीकांत भा. म्होकर
पिंपरी चिंचवड



