आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त भारतातील एकमेव कराटे संघटना “कराटे इंडिया ऑर्गनायझेशन” च्या मान्यतेने दिनांक 8 व 9 ऑक्टोंबर 2022 ला डी.सी. स्कूल खंडाळा जिल्हा पुणे येथे आयोजित राष्ट्रीय कराटे रेफरी / पंच परीक्षेत महाराष्ट्रात राज्यभरातून कराटे प्रशिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून या परीक्षेला सुमारे 100 पेक्षा अधिक मान्यताप्राप्त कराटे प्रशिक्षक सहभागी झाले होते.
परीक्षेच्या शुभारंभा प्रसंगी व्यासपीठावर कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव श्री. संदीप गाडे, खजिनदार श्री. संदीप वाघचौरे, वर्ल्ड कराडे फेडरेशन च्या पंच शाहीन अख्तर मॅडम, राज्य तांत्रिक समितीचे अध्यक्ष श्री. अनुप देठे, सचिव श्री. हरिदास गोविंद, सदस्य श्री. रवींद्र सूर्यवंशी, श्री. जितेश नायर , श्री रतन गारू सर., शर्मिला गारू मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
या रेफरी / पंच परीक्षेत अमरावती जिल्ह्याचे सर्वपरिचित सुप्रसिद्ध कराटे प्रशिक्षक तथा स्पोर्ट शोतोकान कराटे – डो असोसिएशन महाराष्ट्र स्टेट चीफ इन्स्ट्रक्टर सेन्साई सोनल रंगारी जज B परीक्षा पास करुन अमरावती जिल्ह्याचे नाव राज्यात व भारतात ऊचावले.
या परीक्षेला आठ क्रीडा विभागातील आणि 32 जिल्ह्यातील 100 पेक्षा अधिक प्रशिक्षकांनी हजेरी लावली असून काही निवडकच प्रशिक्षक रेफरी पंच परीक्षा पास झाले. पहिल्या दिवशी वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या पंच शाहीन अख्तर मॅडम यांचे पीपीटी द्वारे तसेच श्री. अनुप देठे यांचे मॅटवरील प्रत्यक्ष पंचाची कार्ये या विषयावर सखोल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
सेन्साई सोनल रंगारी यांच्या या यशस्वीते बद्दल जिल्ह्यातील सर्व कराटे प्रशिक्षक तसेच बडनेरा शहरातील सामाजिक कार्यकर्ता श्री राहुल भाऊ शुंगारे , अजय भाऊ जयस्वाल , अभियंता भास्कर जी तिरपुडे साहेब ,अभियंता विलास साखरे द्योजक नितीन भाऊ कदम , मनोज भाऊ गजभिये ,उमेश भाऊ मेश्राम नगरसेवक प्रकाश भाऊ बनसोड, नगरसेविका ईशरत जी बानो , बंडूभाऊ धामणे, सागर कुरुमकर, नितीन चव्हाले सर , बंडूभाऊ सरोदे ,मनोज ठाकरे सर ,संगरक्षक बडगे सर ,डॉक्टर प्राध्यापक खुशाल आळसपुरे सर, आदी अमरावती बडनेरा शहरातील सर्वत्र गनमान्य नागरिकांनी यांच्या या यशस्वीते बद्दल अभिनंदन केले
आदरणीय महोदय वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक न्यूज पेपर मध्ये प्रकाशित करावी ही नम्र विनंती



