Kridavedhnews

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी येथे कुडो मार्शल आर्ट खेळाचे मार्गदर्शन.

क्रीडा दिनाच्या निमित्ताने पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकार व स्कुल गेम्स फेडेरेशन ऑफ इंडिया ची मान्यता असलेला
कुडो मार्शल आर्ट खेळाचे महत्व शारीरिक फायदे याचे मार्गदर्शन आणि स्पर्धा नियम पुणे जिल्हा कुडो संघटने मार्फत देण्यात आले

कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुनील लाडके, उप मुख्याध्यापक सुधीर रोकडे, पर्यवेक्षिका सिंधू मोरे, उपप्राचार्य खुशालदास गायकर यांनी मेजर ध्यानचंद यांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली व पुणे जिल्हा कुडो संघटना अध्यक्ष अरविंद मोरे, सचिव राकेश यादव, कुडो रेफ्री लेखा लोखंडे, श्रुती सुर्वे, ब्लॅक बेल्ट ऋषिकेश जाधव, अंजली सपाटे, धनश्री कोळी, समृद्धी खंदारे, शर्वरी हेंडवळे, वैदेही फडतरे, श्रीदुला कोळी, निशांत पंचमुखे यांनी प्रात्यक्षिक द्वारे कुडो मार्शल आर्ट काय आहे, त्याची नियमावली काय आहे, त्याचा फायदा काय आहे हे शाळेतील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्या मान्यतेने युवा आधार संघटना मार्फत शालेय मुला-मुलींसाठी कुडो मार्शल आर्ट चे अल्प दरात क्लास चालतात याची माहिती देण्यात आली. व शालेय मुलाना सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास क्रीडाशिक्षक गणेश कर्डिले यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर जनरल ध्यानचंद यांची माहिती दिली, शरद सस्ते यांनी सूत्रसंचालन केले व अशोक आवारी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio