अजिंक्य सोशल फांऊडेशन या सामाजिक संस्थेमार्फत महिलासाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले.यावेळी संस्थेचे संस्थापक श्री. सचिन पवार यांनी संस्थेचे प्रस्थाविक केले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी श्रीमती घोडके होत्या.यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचारी यांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी.
त्यात वैयक्तिक स्वच्छता,मासिक पाळीत घ्यावयाची काळजी विविध प्रकारच्या मानसिक, शारिरीक समस्यायावर मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेमार्फत 40 महिलांना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. यावेळी 50 महिला उपस्थित होत्या.श्रीमती संगीता भालेराव,संगीता पाटोळे,संगीता गोवंडे ,बाळासाहेब राठोड यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली करपे यांनी केले.



