पुणे:-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अजिंक्य सोशल फाऊडेशनतर्फे वस्ती भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काळेवाडी फाटा, कावेरीनगर भाजी मंडई येथील झोपडपट्टीतील शालेय पेन, वही, आणि खाऊ वाटप करण्यात आले. तसेच या भागातील विद्यार्थी संक्षम होण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यावेळी अजिंक्य सोशल फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष बाळासाहेब राठोड यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सहयाक आरोग्य अधिकारी आढाव साहेब, व आरोग्य निरीक्षक सोनवने ,कांबळे, आणि वस्तीतील जेष्ठ नागरिक व लहान मुले उपस्थित होते.



