आझादी का 75 अमृतमहोत्सव 2022 या कार्यक्रमात भारतात पहिल्यांदाच परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र, शोर्य चक्र विजेते भारतीय लष्करी अधिकारी एकाच स्टेज वर आले होते कार्यक्रमदरम्यान विंग कमांडर जग मोहन नाथ सर भारतीय हवाई दलाचे दोनदा महावीर चक्र मिळालेले लष्करी अधिकारी 1962 च्या भारत-चीन युद्ध आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते अश्या आपल्या मातृ भूमी ची सुरक्षा करणाऱ्या महान लष्करी अधिकाऱ्याच्या शुभ हस्ते श्री. अरविंद मोरे यांना महाराष्ट्र प्राईड पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले ही अभिमानास्पद बाब आहे. त्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक डी. एफ. एल चे संचालक मा. नरेंद्र गोल्ला यांचे हार्दिक आभार.
अरविंद मोरे यांनी केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया, झी टीव्ही अटकेपार झेंडा तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर मार्गदर्शन करुन आंतराष्ट्रीय खेळाडू निर्माण केल्याबद्दल त्याना बेस्ट मिक्स मार्शल आर्ट ट्रेनर – महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड देण्यात आला.
धन्यवाद
डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी
पुणे जिल्हा कुडो संघटना
युवा आधार संघटना
स्पोर्ट्स एज्युकेशन डेव्हलोपमेंट सोसायटी



