आदरणीय किशोरदा यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा…..
दिनांक 4 ऑगस्ट 2022, स्थळ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड, येथे आदरणीय किशोरदा यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील नामांकित इव्हेंट ऑर्गनायझर श्री नितीनजी गायकवाड यांनी केले होते. मागील दोन महिन्यापासून या कार्यक्रमाचे नियोजन चालू होते. हॉलच्या बुकिंग पासून गायकांच्या सराव पर्यंत रात्रं दिवस मेहनत करून कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यात आले.
या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने श्रोतागण उपस्थित होते.
निवेदकापासून गाण्यांच्या लिस्ट पर्यंत संपूर्ण नियोजन श्री नितीन यांनी योग्य पद्धतीने केले होते.
ठीक पाच वाजता श्री किशोरदा यांच्या पवित्र फोटोस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ओ मेरे दील के चैन या गीताने श्री प्रशांतजी यांनी सुरुवात करून श्रोत्यांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा कार्यक्रम यशस्वी होण्याचे गमक म्हणजे 28 गीतांचे सिलेक्शन होते.
त्याचप्रमाणे पुण्यातील नामांकित ,अनुभवी आणि खरोखरच किशोरदा यांना आपल्या गुरुस्थानी मानणारे सर्व गायक त्यामध्ये आयोजक श्री नितीनजी गायकवाड गायक, श्री किरणजी भामरे, श्री मोहनजी राठोड, श्री प्रशांत ब्रह्मे,श्री अजयजी निकम, श्री उदयजी गाडगीळ, श्री सतीशजी बांदल आणि महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमाची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आमच्या ताई गायिका लक्ष्मीजी यांनी युगलगीते खूप चांगल्या शैलीमध्ये सादर केल्या, त्याचप्रमाणे आमचे निवेदक श्री प्रवीणजी पोतदार यांच्या विविध कलाकारांच्या आवाजाच्या शैलीने संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गजरात बहरुन गेला होता.
मेरे नैना सावन भादो या किरणजी यांच्या गीताने हॉल निशब्द झाला तसेच, श्री मोहनजी यांच्या शास्त्रीय संगीताची खुबी असलेल्या पायल वाली देखना या गीताने हॉल टाळ्यांच्या गजराने भरला होता.
श्री उदयजी यांनी आदरणीय किशोरदांचा अत्यंत महत्त्वाचा मेसेज चलते चलते मेरे ये गीत याद रखना या गीतातून सादर केला. त्याचप्रमाणे श्री नितीनजी यांनी दुर्मिळ परंतु प्रसिद्ध असे शिशे की उम्र वेगळेपण असणारे गीत सादर केले. श्री प्रवीणजी पोतदार यांच्या डाँनच्या डायलॉगाने हॉल आनंदाने भरला होता. आणि त्याला श्री सतीश जी यांच्या *डॉन च्या गीताने चार चांद लावले गेले.
श्री अजयजी यांनी शोर मच गया या गीताने संपूर्ण हॉलमधील श्रोतागणांची मने जिंकली.
प्रसिद्ध गायिका लक्ष्मीजी यांनी ये मोसम आया है, नजरो से कह दो, अश्विनी ये ना तसेच जीना क् अजी प्यार बिना या सर्व गीतांना योग्य तो न्याय दिला. त्याचप्रमाणे ध्वनी श्री अमोल कोळेकर, विजू इफेक्ट्स श्री. विक्रम अंबिके सर, आणि फोटो निर्मिती श्री कबीर पटेल सर. यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
योग्य वेळेत कार्यक्रम चालू होणे तसेच योग्य वेळेत कार्यक्रमाचे सांगता होणे हे यशस्वी कार्यक्रमाचे रहस्य आहे आणि हे श्री नितीनजी यांनी योग्य पद्धतीने हाताळले आहे.
कार्यक्रमास विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती.
असेच कार्यक्रम श्री नितीन जी आपण आयोजित करावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
संचालक
साप्ताहिक क्रीडावेध महाराष्ट्राचा



