श्रेष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त आज आण्णाभाऊसेना बोपखेल रामनगर ह्या ठिकाणी विनम्र अभिवादन केले… !
मराठी साहित्यातील जवळपास सर्व साहित्य प्रकार अण्णाभाऊंनी अत्यंत सक्षमपणे हाताळले. उपेक्षित आणि वंचितांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे त्यांचे लिखाण ज्वलंत आणि प्रेरणादायी आहे.
समाजाला नवी दिशा देऊन सकारात्मक वाटचाल करायला प्रेरित करणारी त्यांची लेखनशैली मराठी साहित्यातील एक सुवर्णगाथाच आहे.
अध्यक्ष श्री संदिप (भाऊ) खांडेकर व उपाध्यक्ष श्री प्रविण (भाऊ) धिवार व आमचे मार्गदर्शक श्री शिवाजी (भाऊ) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज खूप सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या वेळी बोपखेल (रामनगर गणेशनगर) भागातील असंख्य नागरिक व महिला भगिनी उपस्थित होत्या…



