आज सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की, ईश्वरीचे प्रशिक्षक म्हणतात आपल्या क्लबची खेळाडू कु.”ईश्वरी सुनील राजेभोसले” हिने CBSE बोर्डामध्ये ९४.६०% मिळवले..
“ईश्वरी” ही एक उत्कृष्ट साताऱ्यातील स्केटिंग/सायकल पट्टू आहे, “व्ही.के.रोलर स्केटिंग” अकॅडमी मध्ये सराव करत असून, अनेक विश्वविक्रम, राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने ठसा उमटवला आहे.
तसेच दहावीच्या शैक्षणिक वर्षात सकाळी २५ कि.मी सायकल त्यानंतर स्केटिंग त्यानंतर अभ्यास असा दिनक्रम चालू होता.
या यशाबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे “बोर्डाची परीक्षा चालू असताना राज्य पातळीची स्पर्धा त्याचवेळी होती तरीसुद्धा दोन्हीचा समतोल राखत परीक्षा व स्पर्धा दोन्ही गोष्टी यशस्वीरित्या पार पाडल्या..
ईश्वरीच्या वडिलांनी श्री.”सुनील राजेभोसले” यांनी मनामध्ये एकही शंका न बाळगता तिला स्पर्धेलाही स्वतः विरार येथे सोडले.. ईश्वरीच्या वडिलांसारखी दूरदृष्टी व मुलींवरती एवढा मोठा विश्वास ठेवणारे वडील सर्वांना मिळावेत/असावेत.
ईश्वरी आम्हाला तुझा अभिमान आहे, तुझ्यासारखी अभ्यासू व खेळाडू वृत्ती आपल्या क्लब मधून घडावेत हिच प्रार्थना व तुला मनापासून शुभेच्छा..
प्रशिक्षक म्हणून काम बघत असताना ईश्वरी सारखे चांगले खेळाडू १०वी / १२ वी परीक्षा आली की, मधूनच खेळ सोडून जातात मग प्रशिक्षक व खेळाडूंनी घेतलेली मेहनत वाया जाते पण ईश्वरीने मनाशी गाठ बांधून, तिचे प्रशिक्षक व आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला सिद्ध करून दाखवले..
प्रशिक्षक
प्रा. विनोद कदम सर



