Kridavedhnews

Breaking News
FIT HAI TO HIT HIAआंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक.महेश कदम यांना पीएच.डी.विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच गरजू महिलांना मोफत साडी वाटपऑल इंडिया push India Push या राष्ट्रीय आर्मी आयोजीत फिटनेस स्पधेत पारितोषीक पदक१४ मार्च २०२३….एक सुवर्णक्षण… नाबाद शतकी रक्तदान 🩸🩸खेळी रक्तदान.. 🩸..एक शंभरी…. शतक… एक शुन्य शुन्यभव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनपिंपळे गुरव येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीर तपासणी मध्ये १२५ लोकांची तपासणीश्री रामनवमी निमित्त साई मंदिर नेहुली खंडाळे येथे महिलांकरीता मोफत आरोग्य तपासणी शिबिरअलिबाग सांस्कृतिक कला व क्रीडा महोत्सव मोठ्या दिमाखात पार पडले.पहिल्या अलिबाग कला क्रीडा महोत्सवाचे दमदार उदघाटन

1ल्या आशियाई डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धेत पुण्याच्या सहा स्केटिंग डांन्सर्सची नेत्रदीपक कामगिरी.

दि. 31 मे 2022 ते 3 मे 2022 रोजी बिराटनगर, नेपाळ ह्या ठिकाणी पार पडलेल्या 1ल्या अशियाई डांन्स स्केट स्पोर्ट स्पर्धेत भरताचे प्रतिनिधित्व करणार्या पुण्याच्या 6 स्केटिंग डान्स खेळाडूंंनी नेत्रदीपक कामगिरी करीत 8 सुवर्ण व 1 रौप्य पदक जिंकून भरताचे नाव उंचावले. आशियाई स्थरावरील डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धे करिता अशियाई देशातील भारता सह बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तान ह्या देशांचे स्पर्धक सहभागी झाले होते.
1 ल्या अशियाई डान्स स्केट स्पोर्ट स्पर्धेचे आयोजन वर्ल्ड डान्स स्केट स्पोर्ट फेडरेशन, डान्स स्केट स्पोर्ट फेडरेशन ऑफ एशिया, डान्स स्केट स्पोर्ट फेडरेशन ऑफ नेपाळ ह्यानी केले होते.
भारता तर्फे पुण्याच्या 6 खेलाडू  ज्यानी ह्या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केले ते पुढील प्रमाणे आहेत.
मिशेल भस्मे 20 वर्षे वयोगट : 2 सुवर्ण, पलक अगरवाल 18 वर्षे वयोगट : 2 सुवर्ण,  सिमरन किराले 18 वर्षे  वयोगट : 3 सुवर्ण,  स्म्रिति मल्लीक 18 वर्षे वयोगट : 1सुवर्ण व 1 रौप्य, अदिती पान्डे 16 वर्षे वयोगट : 2 सुवर्ण, अणि माही मेहता 14 वर्षे वयोगट : 2 सुवर्ण
पुण्याच्या डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशन चे डान्स कोरियोग्रफर शायनि म्हस्के ह्यानी सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले व तयारी करुन घेतली. श्री. मार्क भस्मे सर ह्यांनी सम्पूर्ण स्पर्धेचे तांत्रीक अधिकारी म्हणून काम पहिले व श्री. रविंद्र साठे ह्यांनी मुख्य संघ प्रमुख म्हणून काम पहिले.
डांन्स स्केट स्पोर्ट असोसिएशन पुणे चे अध्यक्ष श्री. धनंजय विष्णु जाधव ह्यानी सर्व स्पर्धकांना स्पर्धेच्या तयारी साठी  मार्गदर्शन केले व तयारी साठी लागणारी मदत केली.
डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशन पुणे व डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशन पिंपरी चिंचवड ह्यांच्या सयुक्त पुढाकारने
रविवार दि. 3 जुलै 2022 रोजी सर्व भारतीय विजेत्या खेळाडूंचा व अधिकार्यांचा गुणगौराव व सत्कार वेदशाश्त्रोत्तेजक सभा हॉल, हॉटेल कल्पना/ विश्व समोर, सणस ग्राउंड गेट समोर, सदाशिव पेठ, पुणे 30. येथे करण्यात येणार आहे.
सत्कार समारंभ हा ब्रिगेडियर सुनिल लिमये (निवृत्त), ग्रुप कैप्टन रमेश जाधव ( सी ई ओ नं.3 महा. एयर स्क्वाड्रन एन सी सी, पुणे), श्री. प्रविण मेकँजी ( जनरल सेक्रेटरी वाय एम सी ए, पुणे), श्री. महादेव कासगावडे ( डी एस ओ, पुणे), श्री. संतोष मर्डेकर (अंतरराष्ट्रीय बोडीबिल्डर ) ह्या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे श्री. संजय शेंडगे सर, श्री. राजन नायर सर, श्री. मिलिंद क्षीरसागर, श्री. रविंद्र साठे, श्री. किरण पटोळे, श्री. विभाकर तेलोरे, श्री. जयंत देशपांडे सर ह्यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio