Kridavedhnews

आर्य वैश्य युथ पुणे (महाराष्ट्र) तफ राज्यस्तरीय वासवीरत्न पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन

दिंनाक २५/०६/२०२२ रोजी आर्य वैश्य युथ पुणे (महाराष्ट्र) तफ राज्यस्तरीय वासवीरत्न पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन S.P.College pune लेडी रमाई हॉल येथे करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सौ.अंकिता रुद्रवार व कु.समिक्षा जवादवार यांचं गणेशवंदना हे नृत्य सादर करुन झाली.नंतर माता वासवीची आरती, वेंदातकेसरी श्री.रंगनाथमहाराज यांची आरती सौ.मीरा जवादवार,सौ.गौरी गुंडावार ,सौ.अंकिता रुद्रवार यांनी म्हणटली,दीपप्रज्वलन हे प्रमुख पाहुण्यांच हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे श्री.विवेकजी भिमनवार साहेब (IAS) व्यवस्थापकीय संचालक मुंबई फिल्मसिटी
सौ.मेघाताई कुलकर्णी (मा.आमदार भा.ज.पा)
सौ.सुनिताताई वाडेकर
मा.उपमहापौर पुणे)
डॉ.बनगीनवार
(MBBS.M.D.*
श्री.सुर्यकांतभाऊ कोकड आर्य वैश्य युथ संस्थापक अध्यक्ष तसेचडॉ. स्नेहलताई लाभशेटवार अध्यक्ष महिला कार्यकारणी महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थित कोमटी समाजातील २५ विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या रणरागींणीचा सन्मानचिन्ह, *सन्मानपत्र ,मोत्यांची माळ व वासवी मातेचे उपरणे पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व विजेत्या महिलांना युथ शहर उपाध्यक्ष श्री. अक्षय नारलावार यांच Riyansh या फर्म कडुन Dry fruits सप्रेम भेट देण्यात आले.
प्रत्येक विजेत्या महिलांचे व पाहुण्यांचे प्रवेशद्वारापाशी औक्षण फेटे बांधुन स्वागत करण्यात आले.स्वागत कमिटीचे महिला सौ.दशना मुरके,सौ.वैशाली ताई सातभाई,सौ.मोहिनी मुनगीलवार, सौ.सारिकाताई अर्थमवार,सौ.सुप्रिया गादेवार इतर महिला कार्यकत्या उपस्थित होत्या ,
प्रत्येक उपस्थितांना वासवीरत्न बॅच व भगवे फेटे बांधुनच प्रवेश देण्यात येत होता .त्यामुळे सभागृह भगवेमय झाले होते.
समाजातील पहिल्या महिला पायलट,पहिल्या Dysp तसेच सिनेतारिका,बाईक राईडर,यांना विशेष वासवीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळीं विशेष कार्य करणार्या समाजबांधवांचा महाराष्ट्र युथ गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.उपस्थितांसाठी कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व युथ टिमने मनापासून काम केले विशेष सहकार्य श्री. विठ्ठल काका मुर्केवार, श्री हरिभाऊ गादेवार,गजाननभाऊ अर्थमवार,विनायक मुनगीलवार,दिपक भावटणकर ,सुनिल जवादवार,गजानन गुंडावार,विकास कोलपेकवार,केदार उपलेंचवार अमोल मद्रेवार,कुणाल रुद्रवार विनोद मद्रेवार यांचे विशेष सहकार्य लाभले
ज्ञानेश्वरभाऊ कोटगीरे यांनी १५० रोपांचे यशस्वीपणे वाटप केले
सौ.सारिकाताई अर्थमवार कु.रुचा पोकलवार, सौ.सुप्रिया गादेवार, सौ.स्नेहा सायनवार सौ.अमृता उत्तरवार सौ.स्मिता चौलवार,सौ.सुप्रिया कोत्तावार यांनी विशेष प्रयत्न केले
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उत्तमरित्या सौ.वंदना मालशेटवार व सौ.निलिमा पाथरकर यांनी पार पाडले त्याबद्दल युथ टिम पुणे तफ यांचे जाहिर आभार !
गरज जिथे जिथे
युथ तिथे तिथे
याअंतर्गत योग्य मान्यवर व्यक्तिपर्यंत पुरस्कार पोहचवणे,समाजकार्यास प्रोत्साहन देणे हाच या सोहळ्याचं उद्देश होता.पुणे शहरात प्रथमचं भव्य राज्यस्तरीय वासवीरत्न पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आल्याने समाजबांधवांकडुन कौतुक करण्यात येत आहे.असे आर्य वैश्य युथ जिल्हाप्रमुख दिपक भावटणकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio