ऑल सेट्स हायस्कूल स्कूल तर्फे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला दोन वर्षानंतर स्कूल सुरू झाल्यामुळे कोरोना च्या काळात विद्यार्थ्यांचे व्यायामाकडे दुर्लक्ष झाले होते पण स्कूल सुरू झाल्यामुळे तो उत्साह मुलां मध्ये जाणवत होता मुलांनी योगा दिवस निमित्त पूर्ण खडकी बाजारत एक भव्य अशी रैली काढून लोकांना जागृत केले या रॅलीमध्ये सर्व शिक्षक वर्ग व शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग या देखील सहभागी झाल्या होत्या तसेच मुलांनी स्कूल मध्ये देखील योगाचे वेगवेगळे आसन करत उपस्थित पालक शिक्षक व कर्मचारी वर्गांचे मने जिंकली हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व सुंदर रित्या केल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक जस्सूराज अंगदुराई शाळेचे डायरेक्टर जयसिंग डी डेव्हिड पिल्ले यांनी सर्वांचे मन भरून कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ए जी खान शालिनी पोदेती आकांशा आव्हाड नैना बागवान क्रीडा शिक्षक सुनील साठे मेहनत घेतली अशी माहिती शाळेचे क्रीडा शिक्षक सुनील साठे यांनी एका पत्रकाद्वारे कळवली



