Kridavedhnews

Breaking News
निराधारांना दिली दिघी-बोपखेल च्या युवकांनी मायेची उब !वरसोली यात्रेत मोफत आरोग्य तपासणी शिबिरsatish bandalराष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमास रायगडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….जिल्ह्यात महात्मा गांधी जयंती पासून रायगड निकुष्ठ मित्र उपक्रमास सुरुवातअलिबाग नगरपालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य तपासणी शिबिरक्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठानपुण्याचे उमेश लोंढे यांची इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन (इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान🇮🇷) यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधि म्हणून श्री उमेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.कृत्रिम तलावात दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जननिर्मल गणेशोत्सव साजरा करू प्रदूषणाला आळा घालू –

भाऊ, तुमच्यामुळे मी परत खासदार झालो; नवनिर्वाचित भाजप खासदार धनंजय महाडीक यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरी जाऊन मानले आभार

पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – ज्यांच्यामुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय सुकर झाला ते पिंपरी-चिंचवडचे लढवय्ये नेते व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक यांनी शनिवारी (दि. ११) रात्री पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली. “भाऊ, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती भाजपच नाही तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देणारी आहे”, अशा शब्दांत खासदार मडाडीक यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे आभार मानले. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. पिंपरी-चिंचवडमधील जनतेच्या सेवेसाठी तुम्ही लवकरात लवकर पुन्हा नव्या जोमाने काम सुरू करा. आपल्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा भगवा फडकवायचा आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. आमदार जगताप यांनी खासदारपदी निवड झाल्याबद्दल धनंजच महाडीक यांचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू, माजी नगरसेवक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, विजय जगताप व कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

मुंबईत विजयाचा जल्लोष केल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक शनिवारी रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये आले. त्यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी भेट दिली. आमदार जगताप व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली. जगताप कुटुंबियांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडीक यांचे औक्षण करून अभिनंदन करण्यात आले.

लक्ष्मणभाऊंमुळे दुसऱ्यांदा खासदार होण्याचा माझा मार्ग सुकर झाला. भाऊ, मी तुमच्यामुळेच पुन्हा एकदा खासदार होऊ शकलो. तुमची पक्षनिष्ठा, लढवय्येपणा आणि प्रबळ इच्छाशक्ती केवळ भाजपसाठीच नाही, तर सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा व ऊर्जा देणारी आहे. तुम्हाला चांगले आरोग्य लाभो. तुम्ही पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत पुन्हा नव्या जोमाने लवकरात लवकर सक्रिय व्हा. आपल्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी सर्व प्रकारची मदत मी करणार असल्याचा शब्द महाडीक यांनी लक्ष्मणभाऊ जगताप यांना दिला.

दरम्यान, विधानसभेतील आमदारांमधून निवडून द्यावयाच्या ६ जागांसाठी शुक्रवारी (दि. १०) मतदान झाले. निवडणूक रिंगणात ७ उमेदवार उतरल्याने चुरस निर्माण झाली होती. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे चार आणि भाजपचे तीन उमेदवार रिंगणात होते. त्यातील शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडीक यांच्यात सहाव्या जागेसाठी लढाई झाली. त्यात भाजपचे धनंजय महाडीक विजयी झाले. पक्षाने या विजयाचे संपूर्ण श्रेय चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना दिले आहे. आमदार जगताप हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. ते मरणाच्या दारातून परतले आहेत. त्यांना नुकतेच घरी सोडण्यात आले आहे. अजूनही त्यांना तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे.

मात्र आमदार जगताप यांनी पक्षाला एका-एका मताची असलेली गरज ओळखून पिंपरी-चिंचवड ते मुंबईपर्यंत ऍम्ब्युलन्समधून प्रवास करत निवडणुकीत मतदान केले. त्यांची ही पक्षनिष्ठा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील संपूर्ण भाजप भारावून गेली आहे. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मतदानामुळे भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडीक यांचा विजय सोपा झाला. तसेच निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीतील हा विजय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि पुण्यातल्या भाजपच्या दुसऱ्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित केल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio