पुणे: स्केटिंग असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने दिनांक१४मे २०२२रोजी सायंकाळी साडेसात वाजता . विश्वविक्रमविर इशिकाच्या सत्कार समारंभाचे आयोजन.
कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज स्केटींग प्रशिक्षण केंद्र शाहू मार्केट यार्ड कोल्हापूर येथे. पुण्याच्या युवराज स्केटिंग क्लबची कुमारी इशिका चेतन डावरे. वय वर्ष सात या बाल स्केटिंग पटून डोळ्यावर काळी पट्टी बांधून सलग बत्तीस किलोमीटर न थांबता स्केटिंग करण्याचा विश्वविक्रम महाराष्ट्रामध्ये प्रथमच प्रस्थापित केला होता. हा विक्रम दिनांक आठ मे रोजी कोल्हापूर येथे करण्यात आला होता.या विक्रमाची नोंद नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली असून या तिच्या सोनेरी कामगिरीबद्दल इशिकाचा कोल्हापूर या ठिकाणी कोल्हापूरचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार .सतेज उर्फ( बंटी.) डी .पाटील साहेब व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता . इशिका ही नुकतीच कोल्हापूरहून पुण्यामध्ये आल्यानंतर इशिका चा स्केटिंग असोसिएशन ऑफ पुणे यांच्या वतीने विमान नगर येथील आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅक वर भव्य सत्कार करण्यात आला .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे प्रशिक्षक ग्युलीओ रवासी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते इशिकाचा गुच्छ व चॉकलेट देऊन सत्कार करण्यात आला . त्यानंतर इशिकाने डोळ्यावर पट्टी बांधून विमान नगरच्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बाल स्केंटीगपटू व त्यांच्या पालकांनी इशिकाचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.त्यावेळेस इंडिया टीम कोच रवासी यांनी इशिकाच्या सर्व कौशल्याची कला आपल्या व्हिडिओमध्ये चित्रित करून घेतली. त्यानंतर इंडिया टीम कोच रवासी यांनी आपल्या भाषणात इशिकाच्या स्केटिंग कलेचा गौरव केला.त्यानंतर पुणे जिल्हा स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीपाद शिंदे .यांच्या हस्ते मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक गुंजाळ यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार . शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय स्केटिंग खेळाडू विक्रम इंगळे यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिमुकली विश्वविक्रमवीर इशिका डावरेचा स्केटिंग असोसिएशन ऑफ पुणे .यांच्या वतीने इंडिया टीम कोच श्री .ग्युलीओ रवासी यांच्या हस्ते विमान नगर येथील आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅक वर सत्कार करण्यात आला .यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीपाद शिंदे सचिव अशोक गुंजाळ आंतरराष्ट्रीय स्केटिंग पट्टू विक्रम इंगळे आणि बाल स्केटर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवछत्रपती पुरस्कार विजेते व स्केटिंग असोसिएशन ऑफ पुणे संघटनेचे सचिव श्री अशोक गुंजाळ यांनी केले



