Kridavedhnews

लुडो या खेळाला एक बौधिक खेळ म्हणून मान्यता घेऊन राष्ट्रीय स्थरावर हा लुडो खेळ खेळला जातो,भारतातील 18 राज्यांमध्ये लुडो खेळ खेळला जातो

अतिप्राचीन भारताचा विचार केला तर असे लक्ष्यात येते की वेगवेगळ्या नावाने खेळला जाणारा खेळ जसे की सारीपाट, सोंगट्या,चौकस,सतरंज हे खेळ खेळताना दिसतात,भारतातील राजे मनोरंजन म्हणून हे खेळ खेळत असे, कधी त्याला वेगळे स्वरूप मिळत असे,असा हा भारताच्या मातीत वाढलेला खेळ सध्या लुडो या नावाने प्रसिद्ध होत आहे,
लुडो या खेळाला एक बौधिक खेळ म्हणून मान्यता घेऊन राष्ट्रीय स्थरावर हा लुडो खेळ खेळला जातो,भारतातील 18 राज्यांमध्ये लुडो खेळ खेळला जातो असे प्रतिपादन लुडो फेडरेशन ऑफ इंडिया चे टेकनिकल डायरेक्ट शैलेंद्र कुमार यांनी केले,
लुडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या वतीने राज्यस्तरीय रेफरी सेमिनार नाशिक येथे आयोजित करन्यात आले होते ,सदरहू प्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांनी ही माहिती दिली,महाराष्ट्र मधील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी या प्रसंगी उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने सुहास छनचुरे सोलापूर देविदास जवंजाळ अकोला,
शिवाजी वाबळे अहमदनगर, गणेश राठोड औरंगाबाद,पवन राठोड जालना,चक्रनारायण भाऊसाहेब, बाळासाहेब साबळे ,व इयर जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते,
भारतीय स्तरावर लुडो या खेळाला नियम बध्द करून हा खेळ बौद्धिक दृष्टी ने महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना एकाग्रता मिळते व मनोरंजन होते, हा खेळ सिगल्स, डबल्स, मिक्स डबल्स अश्या इव्हेंट मध्ये खेळतात,अशी माहिती लुडो असो,ऑफ महाराष्ट्र चे सचिव बाळासाहेब रणशूर यांनी दिली व हा खेळ महाराष्ट्रभर झपाट्याने वाढवू असे सांगितले तसेच लुडो हा खेळ घराघरात खेळतात,लॉकडाऊन मध्ये फक्त लुडो खेळ खेळला गेला अशी ही माहिती रणशूर यांनी दिली,
सूत्रसंचालन राजीव पाटील सरांनी केले,रेफरी सेमिनार यशस्वी होण्यासाठी कौस्तुभ रावल,इंद्रजीत पलुस्कर,लुम्बिनी रणशूर यांनी प्रयत्न केले,स्वागत प्रा,विकास कसबे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

radio